आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CBI च्या निशाण्यावर रिया अँड फॅमिली:श्रुती मोदी-सॅम्युएल मिरांडा आहेत तरी कोण? सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने रियासह ज्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला, जाणून घ्या त्यांच्याविषयी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज ईडीकडून रिया चक्रवर्तीची चौकशी केली जात आहे.
  • सुशांतचे वडील केके सिंह यांनी रियावर 15 कोटींच्या फसवणूकीचा आरोप केला आहे.

सीबीआयने बिहार पोलिसांच्या विनंतीवरून गुरुवारी 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास हाती घेतला. सीबीआयने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये रियाचे वडील इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सहकारी सॅम्युएल मिरांडा, श्रुती मोदी यांच्या नावाचा समावेश आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी सुशांतशी जोडले गेले होते, त्यांचे आपापसातही कनेक्शन आहे.

  • रियाचे कुटुंब बनले बिझनेस पार्टनर

ईडीने रिया समन्स पाठविला होता. ज्यामध्ये त्यांनी तिला सुशांत आणि तिचा भाऊ शोविक यांच्यासोबतच्या दोन कंपन्यांचा आर्थिक तपशील मागितला आहे. त्यापैकी रिया चक्रवर्ती ही विविड्रेज रियलटीएक्सच्या डायरेक्टर पदी आहे, तर रियाचा भाऊ शोविक हा फ्रंट इंडिया फॉर वर्ल्डमध्ये संचालक आहे. या कंपन्यांची नोंदणी रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्या पत्त्यावर करण्यात आली होती. सप्टेंबर 2019 मध्ये विविड्रेजची स्थापना झाली आणि जानेवारी 2020 मध्ये फ्रंट इंडियाची नोंदणी झाली. सुशांतच्या कमाईचा बराचसा भाग या कंपन्यांमध्ये गुंतवला गेला होता.

  • श्रुती आणि सुशांतचे कनेक्शन फक्त आर्थिक व्यवहाराचे होते

श्रुती रिया आणि सुशांतची कॉमन मित्र होती. श्रुतीचे इंस्टाग्रामवर एक अनव्हेरिफाइड अकाउंट आहे, जे आता प्रायव्हेट केले गेले आहे. श्रुती रिया आणि तिचा भाऊ शोविकची माजी मॅनेजर आहे. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणी श्रुतीचीही चौकशी केली होती.ज्यामध्ये ती सुशांतची एक्स बिझनेस मॅनेजर असल्याचेही समोर आले आहे. सुशांतच्या कंपनीत रिया-शोविकचे सर्व काम श्रुती पाहायची.

श्रुतीने मुंबई पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिने जुलै 2019 ते फेब्रुवारी 2020 या काळात सुशांतसोबत काम केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांत आर्थिकदृष्ट्या सक्षम होता आणि दर महिन्याला जवळपास दहा लाख रुपये खर्च करायचा अशी माहिती श्रुतीने पोलिसांना दिली होती. यामध्ये वांद्रे इथल्या घराचे साडेचार लाख रुपये भाडं तो भरायचा. सुशांतच्या दर महिन्याच्या खर्चाचा हिशोब सुद्धा तिने पोलिसांना सोपवल्याचे कळतंय.

सॅम्युएल मिरांडा ईडीच्या विळख्यात

रिया चक्रवर्तीचा आणखी एक सहकारी सॅम्युएल मिरिंडा याचीदेखील ईडीने चौकशी केली. सॅम्युएल मिरांडाला दोन दिवसांपासून मनी लॉण्ड्रिंगच्या अँगलने विचारपूस केली जात आहे. रियाने सॅम्युएलची सुशांतच्या घरी हाउसकिपिंग मॅनेजर म्हणून नियुक्ती केली होती.

सुशांतच्या एका मित्राने सांगितल्यानुसार, रियाने सुशांतचे घर सोडले तेव्हा सॅम्युएल तिथेच हजर होता. सुशांतच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत सॅम्युएलचा नावाचा उल्लेख केला आहे. कारण त्यांना संशय आहे की, पगार कमी असल्याने सॅम्युएल सुशांतला त्रास द्यायचा. सुरुवातीला सॅम्युएलचा मागोवा घेण्यात मुंबई पोलिस अयशस्वी ठरले होते. आता मात्र ईडीकडून गेल्या दोन दिवसांपासून त्याची चौकशी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...