आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'अपने 2' च्या निमित्ताने खास बातचीत:14 वर्षांनंतर अपनेच्या सिक्वेलमध्ये झळकणार देओल कुटुंबातील 3 पिढ्या, धर्मेंद्र म्हणाले - 'मी या दिवसाची वाट पाहत होतो'

किरण जैन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट दिवाळी 2021 मध्ये प्रदर्शित होईल.

गुरु नानक जयंतीनिमित्त देओल कुटुंबीयांकडून त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अपने’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘अपने 2’ ची तयारी सुरू केली असल्याची घोषणा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.. या चित्रपटात देओल कुटूंबातील तीन पिढ्या - धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल आणि करण देओल एकत्र दिसणार आहेत. धर्मेंद्र यांच्या मते, हेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य असेल.

अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट दिवाळी 2021 मध्ये प्रदर्शित होईल. दिव्य मराठीसोबत झालेल्या संभाषणादरम्यान धर्मेंद्र यांनी सिक्वेलशी संबंधित काही खास वैशिष्ट्ये शेअर केली आहेत.

चित्रपटात आम्ही आजच्या पिढीच्या भावना दर्शवण्याचा प्रयत्न करू
'अपने' हा चित्रपट लोकांना चांगलाच आवडला. लोक चित्रपटात दाखवलेल्या प्रत्येक भावनेशी जोडले गेले आणि म्हणूनच आम्ही त्याचा सिक्वेल घेऊन येत आहोत. या चित्रपटात आम्ही आजच्या पिढीच्या भावना दर्शवण्याचा प्रयत्न करू. आजचे प्रेक्षक जे बघू इच्छितात ते या चित्रपटात दिसेल. भावना कधीच मरत नाहीत, या सिक्वेलमध्ये भावना असतील पण सोबतच थ्रिलदेखील असेल. आम्ही लोकांसमोर एक कथा आणत आहोत जी पूर्णपणे अन प्रेडिक्टेबल असेल. प्रेक्षक काहीतरी वेगळे विचार करतील आणि पडद्यावर काहीतरी वेगळे असेल. मला खात्री आहे की आम्हाला पहिल्या चित्रपटात मिळालेले प्रेम या सिक्वेलमध्येही मिळेल.

मी या प्रोजेक्टबद्दल खूप भावूक आहे
माझ्या करिअरमध्ये मी किती तरी चित्रपट केले, पण 'अपने 2' माझ्यासाठी खूप खास असेल. मी या प्रोजेक्टबद्दल खूपच भावूक आहे. कारण देओल कुटुंबातील 3 पिढ्या एकाच स्क्रीनवर एकत्र दिसतील. मी सनी आणि बॉबी तसेच करणबरोबर काम करणार आहे, ज्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. जणू मी या दिवसाची वाट पाहत होतो. खरं सांगायचं तर माझा नातू करणबरोबर काम करण्याचा आनंद मी शब्दांत वर्णन करू शकणार नाही. मी वेडा झालोय (हसून)... करण माझा नातू आहे, मला खात्री आहे की तो नक्कीच काहीतरी वेगळे करेल.

बॉक्सरची झलक दिसेल, परंतु याची कथा पूर्णपणे वेगळी असेल:
अपने 2 मध्येही बॉक्सरची झलक दिसेल. पण कहाणी पूर्णपणे वेगळे असेल. सध्याच्या पिढीला लक्षात ठेवून याची पटकथा लिहिली गेली आहे. सध्या आम्ही 'अपने 2'ची घोषणा करत आहोत. शूटिंग मार्च 2021 मध्ये सुरू होईल आणि हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होईल.

2007 मध्ये रिलीज झाला होता 'अपने'
2007 मध्ये रिलीज झालेल्या ‘अपने’ या चित्रपटात धर्मेंद्र यांनी एका बॉक्सरची भूमिका साकारली होती. त्यांची मुले अंगद (सनी देओल) आणि करण (बॉबी देओल) यांना वर्ल्ड चॅम्पिअन बॉक्सर बनवण्याचे त्यांचे स्वप्न असते. या चित्रपटात धर्मेंद्र, सनी आणि बॉबी व्यतिरिक्त शिल्पा शेट्टी, कतरिना कैफ, दिव्या दत्ता, किरण खेर, जावेद शेख, परवीन डबास आणि आर्यन वैद्य यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

मुलगी अहानाला जुळी मुलं झाल्याचा धर्मेंद्र यांना आनंद

धर्मेंद्र यांची धाकटी मुलगी अहाना देओलने अलीकडेच जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. धर्मेंद्र म्हणाले, "पुन्हा एकदा आजी आजोबा झाल्याने मला खूप आनंद झाला. तिला नेहमी जुळ्या मुलांची इच्छा होती आणि देवाने तिचे म्हणणे ऐकले (हसत) संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे."

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser