आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आईचे छत्र हरवले:ए. आर. रेहमान यांच्या आई करीमा बेगम काळाच्या पडद्याआड, कलाकारांनी व्यक्त केला शोक

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करीमा गेल्या वर्षभरापासून आजारी होत्या.

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या मातोश्री करीमा बेगम यांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या सोमवारी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेहमान यांनी आपल्या आईचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. करीमा यांचे खरे नाव कस्तुरी होते. रेहमान यांनी आपले दिलीप कुमार हे नाव बदलून जेव्हा रेहमान केले होते, त्यावेळी करीमा यांनीही आपले नाव बदलले होते.

आज अंत्यसंस्कार
करीमा गेल्या वर्षभरापासून आजारी होत्या. 28 डिसेंबर रोजी चेन्नई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करीमा बेगम यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार होतील. रेहमान आपल्या आईच्या खूप जवळ होते. राजगोपाला कुलशेखरन यांच्यासोबत करीमा यांचे लग्न झाले होते. ते एक संगीतकार होते. रेहमान नऊ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. शेखरन यांच्या निधनानंतर आई करीमा यांनीच रेहमान यांचं संगोपन केले होते.

कलाकारांनी व्यक्त केला शोक

गायिका श्रेया घोषाल, दिग्दर्शक शेखर कपूर, गायक-संगीतकार सलीम मर्चंट, दिग्दर्शक मोहन राजा, गायिका हर्षदीप कौर यांच्यासह कलाक्षेत्रातील अनेकांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...