आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांचा शो थांबवणारे पोलिस अधिकारी संतोष पाटील सध्या चर्चेत आहेत. त्या दिवशी उचललेले पाऊल कायद्यानुसारच उचलल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
एका मुलाखतीत बोलताना संतोष पाटील म्हणाले की, 'एक पोलिस अधिकारी असल्याने मी मीडियाला मुलाखत द्यायला नको. मी यावर जास्त बोलणार नाही.'
सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत की,, रात्री 10 वाजेनंतर लाऊड म्युझिक वाजवले जाऊ नये. मी आयोजकांसोबत यावर बोललो. मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. यानंतर मला व्यासपीठावर जावे लागले आणि रहमान आणि तिथे उपस्थित इतर संगीतकारांना थांबवावे लागले. वेळ जास्त होत चालला होता त्यामुळे मला हे पाऊल उचलावे लागले, असे संतोष पाटील म्हणाले.
रहमान म्हणाले - वेळ जास्त झाला आहे, त्यामुळे शो बंद करायला हवा
रहमान यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यात संतोष पाटील शो बंद करण्यासाठी स्टेजवर आल्याचे दिसतात. रहमान त्यात म्हणतात की, वेळ जास्त झाला आहे, त्यामुळे आता शो बंद करायला हवा. पोलिस जे करत आहे, ते चुकीचे नसल्याचेही रहमान म्हणाले.
एआर रहमान यांच्या व्हिडिओवर चाहतेही मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. काही लोकांनी पोलिसाच्या सक्रियतेचे कौतुक केल आहे. तर बहुतांश लोकांनी रहमान यांच्या वर्तणुकीचे कौतुक केले आहे.
युझर्सनी लिहिले- पोलिसवाल्याला हिरो बनायचे होते म्हणून स्टेजवर गेले
एका चाहत्याने लिहिले की, 'तुम्ही स्थिती जशी हाताळली, त्यावरून खूप काही शिकण्याची गरज आहे.' एकाने लिहिले आहे की, 'पोलिसाची भूमिका योग्य नव्हती. हा तुमच्या प्रतिभेचा अपमान आहे. मी संपूर्ण शहराच्या वतीने तुमची माफी मागतो.'
एका चाहत्याने लिहिले की, 'जर काही मिनिटे जास्त झाली तर त्यामुळे काय फरक पडणार होता. या देशात इतरही अनेक मुद्दे आहेत. त्याकडे लक्ष दिले पाहिजे.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.