आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • AR Rahman Says I Think There Is A Gang, Which, Due To Misunderstandings, Is Spreading Some False Rumours. Kangana Ranaut Is Also Reacts On His Statement.

बॉलिवूडमध्ये रहमान विरोधी गँग:ए.आर रहमान यांचा खुलासा, म्हणाले - इंडस्ट्रीमध्ये माझ्या विरोधात एक गट अफवा पसरवत आहे; कंगनाने दिली यावर प्रतिक्रिया

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'ला ए.आर.रहमान यांनी संगीत दिले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाही आणि गटबाजीवरील चर्चांना उधाण आले आहे. याविषयावर आतापर्यंत अनेकांनी आपली मतं मांडली आहेत. आता प्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए.आर. रहमान यांनीही याविषयावर आपले मत व्यक्त करुन एक खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इंडस्ट्रीतील एक गट त्यांच्याविरोधात अफवा पसरवत आहे, त्यामुळे त्यांना काम मिळत नाहीये. यावर अभिनेत्री कंगना रनोटनेही प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'ला संगीत देणा-या ए.आर. रहमान यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'मी चांगले चित्रपट कधीच नाकारत नाही. परंतु असा एक गट आहे जो काही गैरसमजांमुळे माझ्याविरोधात अफवा पसरवत आहे.'

  • 'लोकांनी मुकेश छाबरा यांना माझ्याकडे येण्यापासून रोखले होते'

'दिल बेचारा'विषयी बोलताना रहमान म्हणाले, “जेव्हा मुकेश छाबरा (दिल बेचाराचे दिग्दर्शक) माझ्याकडे आले होते तेव्हा मी दोन दिवसांमध्येट त्यांना गाणी तयार करून दिली होती. छाबरा यांनी मला सांगितले की अनेकांनी त्यांना माझ्याकडे जाऊ नका असे म्हटले. तसेच माझ्याविरोधातही त्यांना निरनिराळ्या गोष्टी सांगितल्या', असा खुलासा त्यांनी केला.

  • या कारणामुळे मला चांगले चित्रपट मिळत नाहीये

रहमान यांनी सांगितले, 'मुकेश छाबरा त्यांच्या गोष्टी ऐकून मला समजले की मला सध्या काम का मिळत नाहीये आणि चांगले चित्रपट माझ्याकडे का येत नाहीयेत. मी डार्क चित्रपट करतोय, कारण माझ्याविरोधात काम करणारा एक गट आहे, जो मला चांगले चित्रपट मिळू देत नाहीये.'

  • कंगना म्हणाली - हा अनुभव प्रत्येकाला येतोय

रहमान यांच्या मुलाखतीची बातमी शेअर करुन टीम कंगनाने यावर देखील सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटमध्ये कंगनाने म्हटले, ‘प्रत्येकाला इंडस्ट्रीमध्ये हा अनुभव येतो. विशेषत जेव्हा तुम्ही एकटे आणि स्वतंत्र व्यक्ती म्हणून राहण्याचा प्रयत्न करता.’