आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ए.आर. रहमान यांचा मुलगा थोडक्यात बचावला:शूटिंगदरम्यान झुंबर कोसळले, म्हणाला - 'त्या धक्क्यातून अद्याप सावरलेलो नाही'

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध गायक संगीतकार ए. आर. रेहमान यांचा मुलगा अमीन मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला आहे. अमीन गुरुवारी त्याच्या एका गाण्याचा व्हिडिओ शूट करत होता. त्यादरम्यान सेटवर एक मोठा अपघात झाला. सेटवर क्रेनला लटकलेले एक झुंबर अचानक खाली कोसळले. हा अपघात जेव्हा झाला त्यावेळी सर्वच शुटिंगमध्ये व्यस्त होते. या अपघातातून तो थोडक्यात बचावला आहे. अमीनने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

वडिलांसोबत अमीन
वडिलांसोबत अमीन

ए. आर. अमीनने पोस्ट शेअर करत दिली माहिती
अमीनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या अपघाताचे दोन फोटो पोस्ट केले आहे. पहिल्या फोटोत ओरिजिनल सेट आणि दुसऱ्या फोटो उद्धवस्त झालेला सेट दिसतोय. या फोटोसोबत त्याने एक पोस्ट लिहिली आहे. सोबतच त्याने देवाचे आभार मानले आहे.

अपघातापूर्वीचे दृश्य
अपघातापूर्वीचे दृश्य
अपघातानंतचे दृश्य
अपघातानंतचे दृश्य

इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत अमीनने लिहिले, "आज मी सुरक्षित आणि जिवंत आहे याबद्दल अल्लाह, माझे आई-वडील, कुटुंब, प्रियजन आणि अध्यात्मिक गुरु यांचा आभारी आहे. तीन दिवसांपूर्वी मी एका गाण्याचे शूटिंग करत होतो. मला टीमवर विश्वास होता की त्यांनी अभियांत्रिकी आणि सुरक्षेची काळजी घेतली असेल. मी कॅमेऱ्यासमोर माझ्या कामावर एकाग्र असतानाच, झुंबर आणि क्रेनला टांगलेले सर्व काही खाली पडले."

जर एक इंचही इतके किंवा तिकडे झाले असते तर...
तो पुढे म्हणाला, "मी अगदी मध्यभागी उभा होतो. जर हे एक इंचही इकडे किंवा तिकडे किंवा काही सेकंद आधी किंवा नंतर झाले असते तर सर्व काही माझ्या डोक्यावर पडले असते. मी आणि माझी टीम पूर्ण शॉकमध्ये आहे आणि त्यातून अद्याप सावरु शकलो नाही."

अमीनची सोशल मीडिया पोस्ट
अमीनची सोशल मीडिया पोस्ट

चाहत्यांनी व्यक्त केली काळजी
अमीनची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून त्यावर कमेंट्स करत नेटकरी त्याच्याबद्दल काळजी व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'देवाची कृपी आहे. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत.' तर आणखी एका यूजरने लिहिले, 'तुझ्या कुटुंबासह आमच्या सर्व चाहत्यांच्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत.'

बातम्या आणखी आहेत...