आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

54 वर्षांचा झाले रहमान:हलाखीच्या परिस्थितीमुळे वडिलांची वाद्ये भाड्याने द्यायचे ए.आर.रहमान, 25 व्या वर्षी दररोज आत्महत्येचा विचार करायचे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ए.आर. रहमान यांचे खरे नाव दिलीप कुमार आहे.

भारतीय संगीतकार ए. आर. रहमान यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 54 वर्षे पूर्ण केली आहेत. 6 जानेवारी 1967 रोजी चेन्नईत त्यांचा जन्म झाला. रहमान यांच्या सांगितिक कारकिर्दीविषयी त्यांच्या चाहत्यांना बरंच काही ठाऊक आहे. मात्र त्यांचे खासगी आयुष्य फार कमी जणांना ठाऊक आहे. रहमान यांचे लग्न सायरा बानोसोबत झाले आहे. या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. खतीजा आणि रहीमा ही त्यांच्या मुलींची तर अमीन हे मुलाचे नाव आहे. रंजक बाब म्हणजे रहमान आणि त्यांचा मुलगा अमीन यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. रहमान यांचे जगभरात अगणिक चाहते आहेत. मात्र त्यांची मुलगी खतीजाला शाळेत वडिलांचा ऑटोग्राफ देणे पसंत नाही. रहमान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी...

एकेकाळी वडिलांची वाद्ये भाड्याने द्यायचे ए. आर. रहमान
रहमान मध्यमवर्गीय तामीळ मुदलियार परिवारातील आहेत. त्यांचे वडील आर. के. शेखर हे तामीळ आणि मल्याळम चित्रपटांचे निर्माते होते. रहमान लहानपणापासून आपल्या वडिलांच्या कामात हातभार लावायचे. रहमान नऊ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची परिस्थितीच बदलली. त्यावेळी आपल्या वडिलांची वाद्ये भाड्याने देऊन त्यांनी अक्षरश: आपल्या कुटुंबाचा गाडा चालवला. काही दिवसांनी त्यांच्या आईने हा व्यवसाय सांभाळला आणि रहमानला कामाचे स्वातंत्र्य दिले. रहमान उत्कृष्ट की-बोर्ड वाजवायचे. बँड भाड्याने शोधून देण्याचे कामही त्यांनी काही दिवस केले. या सगळ्या परिस्थितीने त्यांच्यातला संगीतकार घडला. यातच करिअर करायचे त्यंनी ठरवले आणि ते यशस्वी झाले.

आत्महत्या करायचा होता विचार
रहमान यांना कधीच चित्रपटात संगीत द्यायचे नव्हते. त्यांना फक्त बँड आणि नॉन फिल्मी म्युझिकपर्यंत मर्यादित राहायचे होते. पण त्यांना चित्रपट संगीताची निवड करावी लागली. वयाच्या 11 व्या वर्षीपर्यंत, त्यांनी मल्याळम संगीतात इंस्ट्रूमेंटलिस्ट म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. वयाच्या 25 व्या वर्षीपर्यंत रहमान स्वत: ला अत्यंत अयशस्वी समजायचे आणि दररोज आत्महत्येचा विचार करायचे.

रहमान यांनी 'पंचतान रिकॉर्ड इन' हा आपला पहिला रेकॉर्डिंग स्टुडिओ चेन्नईतील त्यांच्या घराच्या अंगणात बनवला होता. याच स्टुडिओने त्यांचे आयुष्य बदलले. चेन्नईमध्ये असताना अजूनही तेच याच स्टुडिओमध्ये जास्तीत जास्त रेकॉर्डिंग करतात. त्यांच्या सहका-यांनुसार रहमान यांची सर्वात सर्जनशील काम येथे समोर येतात.

म्हणून बदलले नाव
भारतीय संगीतकार, गीतकार आणि पार्श्वगायक ए.आर. रहमान यांना संपूर्ण जगात ओळखले जाते. त्यांचे खरे नाव ए. एस. दिलीप कुमार असे आहे. त्यांचे आईवडील हिंदू होते. रहमान नऊ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांची आई त्यांच्या वडिलांचे म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्स भाड्याने देत असे. याच काळात एका पीर बाबांच्या संपर्कात रहमान यांचे कुटुंबीय आले. त्यांच्या आई पीरबाबांची सेवा करायच्या. तेही त्यांच्या आईला अगदी मुलीप्रमाणे मानायचे. पीरबाबांचे रहमान यांच्यासोबतही घट्ट नाते जुळले होते. दरम्यान रहमान यांना त्यांचे दिलीप कुमार हे नाव कधीच आवडले नव्हते. हे नाव आपल्या प्रतिमेला शोभेसे नसल्याचे त्यांना वाटायचे.

धर्मही बदलला
एका मुलाखतीत रहमान यांनी आपले नाव आणि धर्म बदलण्याच्या कारणाविषयी खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते, ''सूफी गाणी गायला सुरुवात करण्यापूर्वी ते आपल्या आईसोबत बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने तिची जन्मपत्रिका दाखवायला एका हिंदू ज्योतिषाकडे गेले होते. याचदरम्यान रहमान यांनी त्या ज्योतिषाकडे आपले नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी रहमानला दोन नावे सुचवली. एक अब्दुल रहमान आणि दुसरे अब्दुल रहीम. मात्र रहमान यांनी त्यांच्या आईच्या सल्ल्याने अल्लारक्खा रहमान म्हणजेच ए. आर. रहमान हे नाव ठेवले.''

ही 1989 मधील गोष्ट आहे. वडिलांच्या निधनाच्या दहा वर्षांनी रहमान यांनी आपले नाव आणि धर्म बदलला. रहमान हे त्यांना एका हिंदू ज्योतिषाने दिलेले नाव आहे तर अल्लारखा हे त्यांच्या आईने त्यांना दिलेले नाव आहे. अल्लारखाचा अर्थ Protected by God असा होतो. अशाप्रकारे ए.एस. दिलीप कुमारचे ते ए. आर. रहमान झाले.

'जय हो...' ने त्याकाळी तोडले होत सर्व रेकॉर्ड
आज रहमान यांचे नाव जगातील सर्वश्रेष्ठ संगीतकारांमध्ये घेतले जाते. त्यांचे प्रशंसक आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात दिसतील. रहमान यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती त्यांच्या 'जय हो...' या गाण्यामुळे... या गाण्याने अनेक वर्ल्ड रेकॉर्ड मोडले होते. रहमान आपल्या गाण्यांची रेकॉर्डिंग रात्रीच करतात. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याची रेकॉर्डिंग मात्र सकाळी करण्यात आली. सकाळी आवाज चांगला लागतो, अशी लताजींची धारणा असल्याने रहमान यांनी त्यांच्यासाठी आपल्या सगळ्या युनिटला भल्या पहाटे बोलावले होते.

रहमान यांना मिळालेले पुरस्कार
रहमान यांना राष्ट्रीय पुरस्कार, 15 फिल्मफेअर अवॉर्ड, 14 दाक्षिणात्य फिल्मफेअर अवॉर्ड 2014 पर्यंत जिंकले होते. एवढेच नाही, तर जगभरातील सुमारे 138 विविध पुरस्कारांसाठी ते नामांकित झाले आहेत. त्यातील 117 पुरस्कार त्यांनी जिंकले.

'दिलीप कुमार' नावाचे साधर्म्य
ए.आर. रहमान यांचे खरे नाव दिलीप कुमार आहे. त्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून अल्लाहरखा रहमान असे नाव करून घेतले. त्यांच्या नावाबाबत हाही एक योगायोग आहे की, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नीचे नाव सायरा बानो आहे. रहमान यांच्या बायकोचे नावही सायरा बानो असेच आहे. पती-पत्नीच्या नावातील हा योगायोगच म्हणावा लागेल.

रहमान यांच्या काही खास गोष्टी...

  • आंतरराष्ट्रीय यशस्वीतेनंतरही रहमान यांनी दक्षिण भारतीय चित्रपटांतील गाणे सोडले नाही.
  • एकाच वर्षात दोन ऑस्कर जिंकणारे ते पहिले आशियायी संगीतकार ठरले आहेत.
  • टाइम्स पत्रिकेने त्यांना मोझार्ट ऑफ मद्रास ही पदवी दिली आहे.
  • एका खासगी टेलिकॉम कंपनीसाठी रहमान यांनी संगीत आणि स्वत:चा आवाज दिलेली रिंगटोन आज जगातील सर्वाधिक डाऊनलोड केली जाणारी रिंगटोन ठरली आहे.
  • कायम अनुपस्थित राहावे लागत असल्याने अभ्यास होत नसल्याने त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षीच शाळा सोडली होती.
  • 2009 मध्ये पत्रिकाने रहमान यांना जगभरातील प्रतिभाशाली लोकांच्या यादीस स्थान दिले होते.
बातम्या आणखी आहेत...