आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहित आहे का?:संगीत निर्मिती करताना स्टुडिओत नेट व फोन बंद करण्यास सांगतात रहमान, संगीतासाठी वापरतात हे अ‍ॅप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिव्हल-2019 मध्ये रहमान - Divya Marathi
नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिव्हल-2019 मध्ये रहमान
  • जन्म- 6 जानेवारी 1967
  • शिक्षण- वेस्टर्न क्लासिकल म्युझिक (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी)
  • कुटुंब- आई- करीमा बेगम, पत्नी- सायरा बानू (संगीतज्ञ), मुलगा- ए.आर अमीन (प्लेबॅक सिंगर), मुलगी- रहिमा, खातिजा
  • पुरस्कार- दोन ऑस्कर पुरस्कार, दोन ग्रॅमी, एक बाफ्टा अवाॅर्ड, गोल्डन ग्लोब, चार नॅशनल फिल्म अवाॅर्ड, 15 फिल्मफेअर

53 वर्षीय ए.आर.रहमान यांना क्षेत्रात जवळपास तीन दशके पूर्ण झाली आहेत. तामिळ चित्रपटसृष्टीपासून सुरुवात केलेल्या रहमान यांनी आजवर हॉलिवूड आणि नंतर ब्रिटन, चीन आणि जपानच्या चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. दरम्यान, तामिळ चित्रपटांसाठी सर्वाधिक संगीत निर्मिती केली आहे. हिंदी चित्रपटांसाठी गाणी देणे कमी का केले, असे विचारल्यावर एका मुलाखतीत रहमान यांनी धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले, मला तर संगीत द्यायचे आहे. मात्र बॉलिवूडमधील एक गट माझ्या विरोधात लोकांना भडकवत आहे. ऑस्कर विजेत्या संगीतकाराने हिंदी चित्रपटांसाठी का काम करावे, अशी प्रतिमा तयार करण्यात आली आहे.

  • वादग्रस्त ठरले आहेत रहमान

रहमान यांनी आतापर्यंत 200 चित्रपट, म्युझिक अल्बम, शॉर्ट व्हिडिओसाठी संगीत दिले आहे. 2020 मध्ये त्यांनी 9 शॉर्ट व्हिडिओसाठी संगीत दिले होते. रहमान वादग्रस्तही ठरले. 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्सच्या थीम साँगवर वाद निर्माण झाला होता. रहमान यांनी यासाठी पाच कोटी रुपये आकारले होते. मात्र गाणे फ्लॉप झाल्यावर पुन्हा गाणे देण्यास नकार दिला होता. लंडनमधील एका कॉन्सर्टमध्ये केवळ तामिळ गाणे गाण्यावरूनही वाद झाला होता. रहमान यांची मुलगी खातिजाच्या बुरखा घालण्यावरूनही रहमानवर टीका झाली होती.

  • कोणते अ‍ॅप वापरतात रहमान?

रहमान हे चित्रपट क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्यांमध्ये सर्वात अग्रेसर आहेत. ते 1994पासून मॅकचा वापर करत आहेत. तेव्हा संगीत उद्योगात कोणीही मॅकचा वापर करत नव्हते. रहमान आधी वर्ल्ड टूरमध्ये आपल्यासोबत संगीत वाद्य घेऊन जायचे. मात्र आता फक्त आयपॅड घेऊन जातात. त्यावरच त्यांचे सर्व संगीत वाद्ये आहेत. रहमान नियमितपणे आय तबला, आय लहरा, स्पेसक्राफ्ट म्युझिक अ‍ॅप, क्वांटा ग्रॅन्युलर सिंथ अ‍ॅप, लॉजिक, ब्लॉक्ससारख्या अ‍ॅपचा वापर करतात. तसेच त्यांना फोटाेग्राफीची देखील आवड आहे. यासाठी ते फेसट्यून 2 अ‍ॅपही खूप वापरतात.

बातम्या आणखी आहेत...