आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वर्षांची झाली आराध्या बच्चन:ऐश्वर्या- अभिषेकने दिली ग्रॅण्ड बर्थडे पार्टी, बिग बी- जया बच्चन यांचीही हजेरी

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची लाडकी मुलगी आराध्या बच्चन हिने 16 नोव्हेंबरला तिचा 11 वा वाढदिवस साजरा केला. या खास निमित्त कुटुंबाने घरी एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आराध्या तिच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत केक कापताना दिसत आहे. यादरम्यान अमिताभ बच्चन आणि जया बच्चन देखील पार्टीत हजर होते. आराध्याने आजोबा बिग बींना स्वतःच्या हाताने केकही खाऊ घातला. लूकबद्दल बोलायचे झाले तर आराध्याने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.

आराध्या बच्चनच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचले स्टार्स
मुलीच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक आणि ऐश्वर्याने आयोजित केलेल्या ग्रँड पार्टीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील त्यांच्या सर्व मित्रांनी हजेरी लावली होती. रितेश देशमुख पत्नी जिनिलियाआणि मुलांसह पार्टीत पोहोचला. याशिवाय 90 च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेही यावेळी हजर होती. ऐश्वर्या राय बच्चनची आई वृंदा राय देखील या पार्टीत सहभागी झाल्या होत्या.

व्हिडिओ पाहण्यासाठी वरील छायाचित्रावर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...