आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:पोलिसांकडे जबाब नोंदवून परतले धर्मा प्रॉडक्शन्सचे सीईओ अपूर्व मेहता, जवळजवळ तीन तास सुरु होती चौकशी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करण जोहर आणि त्याच्या धर्मा प्रॉडक्शन्सवर सतत उपस्थित होत आहेत प्रश्न

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मंगळवारी धर्मा प्रॉडक्शन्सचे सीईओ अपूर्व मेहता यांचा जबाब नोंदवला आहे. मुंबईच्या अंबोली पोलिस स्टेशनमध्ये सुमारे तीन तास झालेल्या चौकशीत पोलिसांनी त्यांना ‘ड्राईव्ह’ हा चित्रपट थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यामागचे कारण तसेच चित्रपटाविषयी सुशांतसोबतच्या कराराविषयी विचारणा केली.

चौकशीदरम्यान चित्रपट निर्मितीत अडीच वर्षे उशीर का झाला?, धर्मा प्रॉडक्शन्ससारख्या ब्रॅण्डला थिएटर रिलीजसाठी वितरक का मिळाले नाहीत?, शिवाय ओटीटीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत सुशांतशी झालेली बातचीत आणि त्याला निर्णय प्रक्रियेतून वेगळे ठेवणे, यासाह अनेक मुद्द्यांवरही पोलिसांकडून मेहता यांना प्रश्न विचारले गेले.

  • ओटीटीच्या रिलीजमुळे सुशांत खूश नव्हता

सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांत आणि करण जोहर यांच्यात ड्राईव्ह या चित्रपटावरुन मतभेद निर्माण झाले होते. कारण हा चित्रपट ओटीटीवर नव्हे तर थिएटरमध्ये रिलीज व्हावा, असे सुशांतचे म्हणणे होते. मात्र त्याला पुर्वकल्पना न देता चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला गेला. यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि यानंतरच करण जोहरने सुशांतला फ्लॉप अभिनेता असल्याचे सांगत त्याच्यासोबत पुन्हा कधीही काम न करण्याची घोषणा केली होती.

  • करण आणि धर्मा प्रॉडक्शन्सवर सतत उपस्थित होत आहेत प्रश्न

याप्रकरणी लवकरच धर्मा प्रॉडक्शन्सचा मालक करण जोहरचीही पोलिस चौकशी करणार आहेत, याप्रकरणात कंपनीच्या सीईओचे विधान खूप महत्वाचे ठरले आहे, कारण त्यांच्या जबाबावरुनच करण जोहरच्या चौकशी होईल. सुशांतच्या निधनापासून करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्शन्सवर प्रश्न उपस्थित होत आहेत.