आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फर्स्ट लूक:‘अरण्यक', ‘दसवींपासून ते ‘सायना' आणि ‘पेंट हाउस'पर्यंत, अपकमिंग प्रोजेक्ट्सच्या फर्स्ट लूकमधून ताऱ्यांनी जिंकली चाहत्यांची मने

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक चित्रपटांचे फर्स्ट लूक रिलीज झाले आहेत.

आगामी वेब सीरिज आणि चित्रपटांतील ताऱ्यांचे काही फर्स्ट लूक्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात अभिषेकचा ‘दसवीं', सोनाक्षीचा ‘बुलबुल तरंग', रवीनाचा ‘अरण्यक', परिणीतीचा ‘सायना' आणि बॉबीच्या ‘पेंट हाउस'चा समावेश आहे.

  • बुलबुल तरंग

नेटफ्लिक्सची वेब सिरीज ‘बुलबुल तरंग'मधून सोनाक्षी सिन्हाचा फर्स्ट लूकदेखील समोर आला आहे. चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. यात राज बब्बर आणि ताहिर राज भसीनदेखील आहेत.

  • सायना

परिणीती चोप्रा अभिनीत ‘सायना'च्या टीजरसोबतच तिचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला. यात परिणीती एका बँडमिंटन खेळाडूच्या भूमिकेत आहे.हा सायना नेहवालचा बायोपिक आहे.

  • अरण्यक

रवीना टंडनची नेटफ्लिक्सवर येणारी सीरिज ‘अरण्यक' मधून तिचा पोलिस अधिकाऱ्याच्या गेटअपमधील फर्स्ट लूक रिलीज झाला. यातून ती डिजिटलमध्ये पदार्पण करत आहे.

  • पेन्ट हाउस

अर्जुन रामपाल, बॉबी देओल अभिनीत सीरिज ‘पेंट हाउस’मधून दोन्ही अभिनेत्यांचा लूक शेअर करण्यात आला आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर येईल. ही एक थ्रिलर सिरीज आहे, ती मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे.

दसवीं

अभिषेक बच्चन अभिनीत ‘दसवीं'च्या सेटवरुन शूटिंगच्या 10 व्या दिवशी अभिषेकचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला. चित्रपटात अभिषेक एका दबंग नेत्याच्या रूपात दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...