आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आम्ही सलमानएवढे मोठे स्टार बनू शकलो नाही':लोक आमची तुलना सलमानशी करतात तेव्हा कसे वाटते?, अरबाजचा वडील सलीम यांना प्रश्न

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अरबाज खानचा नवीन शो ‘द इनव्हिसिबल विथ अरबाज खान’ सध्या चर्चेत आहे. या शोच्या पहिल्या भागात पाहुणे म्हणून त्याचे वडील सलीम खान हजेरी लावणार लावली. यावेळी शोमध्ये अरबाजने वडील सलीम खान यांना एक प्रश्न केला की, सलमानच्या तुलनेत मला आणि सोहेलला तेवढे यश मिळू शकले नाही, याविषयी लोक जेव्हा तुम्हाला विचारणा करतात, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते? याचे उत्तर देताना सलीम खान म्हणाले की, माझी सर्व मुले मेहनती आहेत. आज भलेही ते सलमान एवढे यशस्वी झाले नसतील, पण किमान त्यांनी त्यांची मेहनत सुरू ठेवली आहे.

आम्ही सलमान इतके यशस्वी होऊ शकलो नाही - अरबाज
वडील सलीम यांच्याशी संवाद साधताना अरबाज म्हणाला, 'सलमान जगाच्या नजरेत एक कर्तृत्ववान आणि मोठा स्टार आहे. त्याच्या तुलनेत आम्हाला यश मिळाले नाही. असे जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते?

अरबाजच्या या प्रश्नाचे उत्तर देताना सलीम खान म्हणाले, 'जेव्हा मी प्रत्येकाची मेहनत पाहतो तेव्हा मला वाटते की तेही प्रयत्न करत आहेत. मी खूप आशावादी व्यक्ती आहे, मला वाटते प्रत्येकासाठी काहीतरी नक्कीच चांगले घडेल. निदान ते आपला वेळ वाया घालवत नाही याचे मला समाधान आहे,' असे सलीम खान म्हणाले.

तुम्ही जितके नम्र असाल तितके यशस्वी व्हाल - सलीम
यश आणि अपयश कसे हाताळायचे यासाठी अरबाजने वडील सलीम यांचा सल्ला घेतला. अरबाजशी बोलताना सलीम खान म्हणाले, 'जेव्हा लोक अयशस्वी होतात तेव्हा ते त्यातून मार्ग काढतात, पण जेव्हा ते यशस्वी होतात तेव्हा ते यश त्यांच्या डोक्यात जाते, जे पुढे त्यांच्या अपयशाचे कारण बनते.'
सलीम खान पुढे म्हणाले, 'तुम्ही जितके नम्र असाल तितके यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. माणसाने आपली मुळे कधीही विसरता कामा नये,' असा सल्ला त्यांनी अरबाजला या शोमध्ये दिला.

सर्व भावंडांमध्ये मोठा आहे सलमान
सलीम खान यांनी 18 नोव्हेंबर 1964 मध्ये सलमा यांच्याशी लग्न केले. त्यानंतर 80 च्या दशकात त्यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरे लग्न केले. हेलन आणि सलीम खान यांना स्वतःचे मूल नाही, त्यांनी अर्पिता खानला दत्तक घेतले आहे. तर पहिली पत्नी सलमापासून सलीम खान यांना सलमान, अरबाज, सोहेल आणि अलविरा खान अशी चार मुले आहेत. अभिनेता सलमान खान सर्व भावंडांमध्ये मोठा आहे.

सलीम खान हे चित्रपटसृष्टीतील दिग्गज लेखक आहेत
सलीम खान यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांसाठी लेखन केले. सलीम आणि जावेद अख्तर यांची जोडी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावशाली लेखकांमध्ये गणली जाते. अमिताभ बच्चन यांना सुपरस्टार बनवण्यात या दोघांचाही महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी लिहिलेल्या कथांमुळे अमिताभ खूप लोकप्रिय झाले.

'जंजीर' आणि 'शोले'सारखे चित्रपट सलीम-जावेद या जोडीने लिहिले होते. सलीम-जावेद यांच्या सल्ल्यानंतरच प्रकाश मेहरा यांनी अमिताभ यांना या 'जंजीर' या चित्रपटासाठी कास्ट केल्याचे सांगितले जाते.

'तनाव' या वेब सिरीजमुळेही चर्चेत होता अरबाज
अरबाजने 1996 मध्ये आलेल्या 'दरार' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'प्यार किया तो डरना क्या', 'कयामत', 'गर्व' आणि 'मालामाल वीकली' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर 'दबंग' आणि 'दबंग 2' सारख्या चित्रपटांसाठी त्याने अभिनेता आणि निर्माता अशा दुहेरी भूमिका पार पाडल्या. गेल्यावर्षी त्याची 'तनाव' ही वेब सिरीज आली होती, जी काश्मीरच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.

दर शुक्रवारी येतो अरबाजचा शो
अरबाजचा शो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. सलीम खान यांच्यानंतर अरबाज खानच्या शोमध्ये जावेद अख्तर, शत्रुघ्न सिन्हा, वहिदा रहमान आणि हेलन हे कलाकारदेखील सहभागी होणार आहेत. अरबाजचा हा शो दर शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बातम्या आणखी आहेत...