आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वाद:सलमान खानवरील आरोपानंतर अभिनव कश्यपवर कायदेशीर कारवाई करणार, अरबाज खानचा इशारा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनव हा दिग्दर्शक अनुराग कश्यपचा भाऊ असून त्याने दबंग हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
Advertisement
Advertisement

अभिनेता सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून माझे करिअर संपवले, असा धक्कादायक आरोप दिग्दर्शक अभिनव कश्यपने केला आहे. फेसबुकवर एक लाबंलचक पोस्ट लिहून अभिनवने सलमानसह त्याचे वडील सलीम खान आणि दोन्ही भाऊ सोहेल-अरबाज यांचा उल्लेख केला. मात्र आता त्याचे हे सर्व आरोप अरबाज खानने फेटाळून लावले आहेत. अभिनव कश्यप हे सगळं का बोलला माहित नाही. आम्ही त्याच्याविरोधात कायदेशीर पावलं उचलली आहेत, असे अरबाज खानने सांगितले आहे. 

काय म्हणाला अरबाज खान? 

दोन वर्षांपासून आमच्यात कुठलाही संवाद झालेला नाही. ‘दंबग-2’ वर आम्ही काम करणार होतो पण काही जुळले नाही म्हणून आम्ही व्यावसायिकरित्या वेगळे झालो. अभिनव कश्यप हे सगळे का बोलला माहित नाही. आम्ही त्याच्याविरोधात कायदेशीर पावले उचलली आहेत. त्याने पोस्ट टाकताच आम्ही कायदेशीर पावले उचलली असून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अरबाज खानेने दिली. अभिनव हा दिग्दर्शक अनुराग कश्यपचा भाऊ असून त्याने दबंग हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.  

सलीम खान यांनीही दिली प्रतिक्रिया 

सलीम खान म्हणाले, “हो. आम्हीच सगळे खराब केलंय ना. आधी तुम्ही जाऊन त्यांचे चित्रपट पाहा आणि त्यानंतर आपण बोलू. हे निरुपयोगी लोक आहेत. या लोकांकडे दुसरे कोणतेही काम नाही. हे काहीही उलटं सुलटं बोलतील आणि त्यावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी, हेच यांना हवं असतं. माझ्या करिअला 50 वर्षे झाली आहेत. हे कालचे आलेले प्रश्न विचारतात. त्यावर प्रतिक्रिया देऊन मी माझा वेळ वाया घालवणार नाही.”

काय म्हणाला होता अभिनव कश्यप? 

बॉलिवूडमधील घराणेशाहीने माझे शोषण केले. ‘दबंग’सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यानंतरही माझी आज ही अवस्था आहे. अरबाज खानला चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे होते म्हणून माझ्याकडून ‘दबंग 2’ काढून घेण्यात आला. याविरोधात मी आवाज उठवला. म्हणून त्यांनी इतर प्रोजेक्टही माझ्याकडून काढून घेतले. शिवाय मला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशीही धमकी दिली, असा आरोप अभिनवने सलमान आणि त्याच्या कुटुंबावर लावला आहे.

Advertisement
0