आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडमध्ये वाद पेटला:अभिनव कश्यपच्या आरोपानंतर सलमान खानचा पलटवार, भाऊ सोहेल-अरबाज यांनी दाखल केला मानहानीचा दावा 

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खान भावांनी अभिनव कश्यपविरूद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे
Advertisement
Advertisement

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात अनुराग कश्यपचा भाऊ अभिनवने सलमान खान आणि त्याच्या भावांवर त्याचे करिअर संपवल्याचा आरोप केला होता. आता, अरबाज खान आणि सोहेल खान यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारला असून अभिनव कश्यपविरूद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे

यापूर्वीच खटला दाखल करणार होते खान ब्रदर्स

 बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, अरबाजने सांगितले की, यापूर्वी चित्रपटातून माघार घेण्याविषयी आणि खान बंधूंमधील मतभेदांबद्दल पोस्ट केल्यावर अभिनवविरुद्ध कायदेशीर कारवाई केली होती. अरबाजने खुलासा केला की, 'दबंग 2' वर काम सुरू केल्यापासून त्याची अभिनवरसोबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. त्याने पुढे असा दावा केला की हे सर्व कोठून येत आहे हे माहित नाही परंतु कश्यपविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा त्यांचा विचार होता.

हा होता अभिनवचा आरोप

बॉलिवूडमधील घराणेशाहीने माझे शोषण केले. ‘दबंग’सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यानंतरही माझी आज ही अवस्था आहे. अरबाज खानला चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे होते म्हणून माझ्याकडून ‘दबंग 2’ काढून घेण्यात आला. याविरोधात मी आवाज उठवला. म्हणून त्यांनी इतर प्रोजेक्टही माझ्याकडून काढून घेतले. शिवाय मला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशीही धमकी दिली, असा आरोप अभिनवने सलमान आणि त्याच्या कुटुंबावर लावला आहे.

सुशांतच्या मृत्यूशी का जुळत आहे अभिनव?

रिपोर्ट्सनुसार, अरबाजने अभिनवला दबंग 2 च्या दिग्दर्शनाची ऑफर दिली, तेव्हा सलमानने हस्तक्षेप न केल्यावरच त्याने चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची अट घातली होती. अरबाजने सलमानला ही गोष्ट सांगितली, तेव्हा सलमानने अरबाजलाच दबंग 2 दिग्दर्शित करायला सांगितला होता. यानंतर खान ब्रदर्स आणि अभिनव यांच्यातील सर्व संवाद संपला होता. अभिनयच्या कारकीर्दीत खान कुटुंबीयांना अजिबात रस नाहीये, सलमानच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार आपल्या अपयशाला तो सुशांतच्या मृत्यूशी जोडून संधी साधून घेण्याचा प्रयत्न करत आहे.  

Advertisement
0