आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'बिग बॉस 16' च्या टॉप-5 फायनलिस्टपैकी अर्चना गौतमचे वडील गौतम बुद्ध यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पीए संदीप सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. संदीप सिंहने आपल्या मुलीसाठी जातीवाचक शब्द वापरल्याचा आणि जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आरोप- प्रियांका गांधींना भेटू दिले नाही
गौतम बुद्ध यांनी मेरठमधील परतापूर पोलिस ठाण्यात संदीप सिंहविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दावा केला की, त्यांची मुलगी अर्चना गौतम बऱ्याच दिवसांपासून प्रियंका गांधी वाड्रा यांना भेटण्याचा प्रयत्न करत होती, मात्र संदीप सिंग यांनी तिला प्रियांका गांधींशी भेटू देत नव्हते.
सुरक्षेची मागणी केली
त्यांनी सांगितले की, प्रियंका गांधींच्या निमंत्रणावरून अर्चना गौतम यांना संदीप सिंह यांनी 26 फेब्रुवारी रोजी छत्तीसगडच्या रायपूर येथे काँग्रेस महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी बोलावले होते. अर्चनाने प्रियंका गांधींसोबत भेटीची वेळ मागितली. पण संदीप सिंहने नकार दिला आणि नंतर तिच्याशी गैरवर्तन केले. अर्चनाच्या वडिलांनीही आपल्या मुलीच्या जीवाला धोका असल्याचे कारण देत तिच्या सुरक्षेची मागणी केली.
504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल
मेरठ पोलिसांनी आता या प्रकरणी आयपीसी कलम 504, 506 आणि SC ST कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
अर्चनानेही आरोप केले
अर्चना गौतम फेसबुकवर लाईव्ह आली होती. जिथे तिने संदीप सिंगवर अनेक आरोप केले होते. ती म्हणाली होती की, संपूर्ण काँग्रेस पक्ष संदीप सिंह यांच्यावर नाराज आहे. संदीप सिंग हे कोणालाही भेटू देत नाहीत. प्रियांका गांधी वड्रा यांना भेटू देत नाही, मला त्यांनी तुरुंगात टाकण्याची धमकीही दिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.