आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाने हिरावली आई:गायक अरिजीत सिंगच्या आईचे निधन, कोलकाताच्या रुग्णालयात दोन आठवड्यांपासून सुरु असलेली कोरोनाशी झुंज ठरली अपयशी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 19 मे रोजी आदिती सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगची आई आदिती सिंग यांचे निधन झाले आहे. त्या मागील 14 दिवसांपासून कोलकाताच्या एका रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत होत्या. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता अखेरचा श्वास घेतला. बंगाली अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने 6 मे रोजी सोशल मीडियावर आदिती सिंग रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली होती.

स्वस्तिका मुखर्जीने 6 मे रोजी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते, 'गायक अरिजीत सिंगच्या आईला A निगेटिव्ह ब्लडची आवश्यकता आहे. त्यांना आमरी (रुग्णालय), ढकुरीया येथे दाखल करण्यात आले आहे. आज याची आवश्यकता आहे. कृपया संपर्क साधा," असे सस्तिकाने म्हटले होते.

एक दशकापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे अरिजीत
34 वर्षीय अरिजीत सिंग हा पश्चिम बंगालच्या ममुर्शिदाबादचा रहिवासी आहे. त्याचे वडील केदारसिंग हे पंजाबी तर आई आदिती बंगाली होत्या. गेल्या एक दशकापासून अरिजीत बॉलिवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून काम करतोय. 2011 मध्ये रिलीज झालेल्या 'मर्डर 2' चित्रपटातील 'फिर मोहब्बत' या गाण्याद्वारे त्याने पार्श्वगायकाच्या रूपात बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्याला खरी ओळख 'आशिकी 2' मधून मिळाली. या चित्रपटातील त्याने गायलेले 'तुम ही हो' हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले आणि या गाण्यासाठी त्याने अनेक पुरस्कार आपल्या नावी केले. सूफी, वेस्टर्न क्लासिकल, रवींद्र संगीत, पॉप, ईडीएम, गझल आणि भारतीय शास्त्रीय संगीतात अरिजीत पारंगत आहे.

फोर्ब्सच्या 2019 च्या यादीत 26 व्या स्थानावर होता अरिजीत

डिसेंबर 2019 मध्ये, अरिजीत फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणार्‍या 100 सेलिब्रिटींच्या यादीत 26 व्या स्थानावर होता. त्याची संपत्ती 71.95 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. 2019 मध्ये अरिजीतने 18 चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले होते. यात वरुण धवन-आलिया भट्ट स्टारर 'कलंक', शाहिद कपूर-किआरा आडवाणी स्टारर 'कबीर सिंह', सुशांत सिंह राजपूत-श्रद्धा कपूर स्टारर फिल्म 'छिछोरे' आणि आयुष्मान खुराणा-तब्बू स्टारर 'अंधाधुन' या चित्रपटांचा समावेश आहे. अरिजीतच्या कमाईमधील एक मोठा भाग हा त्याच्या जगभरातील कॉन्सर्ट्समधून आला आहे.

बातम्या आणखी आहेत...