आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमाईवरुन तुलना झाल्याने भडकला अभिनेता:कमाईवरून मलायका अरोराशी तुलना करणाऱ्यांवर भडकला अर्जुन, म्हणाला - 2021 मध्ये असे होणे खुपच दुःखद आणि लाजिरवाणे आहे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्जुन म्हणाला - मलायकाची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने अलीकडेच आपली नाराजी व्यक्त केली आहे. नुकतेच एका रिपोर्टमध्ये त्याच्या आणि मलायका अरोराच्या कमाईची तुलना करण्यात आली होती. यावर अर्जुनने आपली नाराजी व्यक्त करताना म्हटले की, 2021 मध्ये असे होणे खूपच दुःखद आणि लाजिरवाणे आहे.

मलायकाची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही
अर्जुन कपूरने त्याच्या सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. आता त्याने ही पोस्ट डिलीटदेखील केली आहे. अर्जुनने लिहिले, 'हे खुपच दुःखद आणि लाजिरवाणे आहे. 2021 मध्ये अशा प्रकरचे मथळे दिले जात आहेत. अर्थातच ती चांगले कमावते आणि ती इथपर्यंत पोहोचली आहे त्यासाठी तिने अनेक वर्ष काम केले आहे. आज ती ज्या स्थानी आहे, तिथे तिची कुणाशीही अगदी माझ्या कामाईशीही तुलना व्हायला नको,' असे म्हणत अर्जुन व्यक्त झाला आहे.

मी दररोज तिच्याकडून काही ना काही शिकत असतो
काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत मलायका अरोराबद्दल बोलताना अर्जुन कपूर म्हणाला होता, 'ज्या प्रकारे एक महिला म्हणून तिने वयाच्या 20 व्या वर्षापासून आतापर्यंत काम करून आयुष्यात स्वतःचा वेगळा मार्ग तयार केला आहे ते कौतुकास्पद आहे. ती एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असण्यासोबतच स्वावलंबी स्त्री आहे. मी तिला कधीच कोणत्या गोष्टीची तक्रार करताना ऐकलेले नाही. नकारात्मक बोलताना ऐकलेले नाही. ती कोणाचाही जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलण्याचा प्रयत्न करत नाही. ती नेहमीच सन्मानपूर्वक स्वतःचे काम करते. मी प्रत्येक दिवशी तिच्याकडून काही ना काही शिकत असतो.'

2019 मध्ये दिली होती नात्याची कबुली
अर्जुन आणि मलायका मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये अर्जुन कपूरने इंस्टा पोस्टद्वारे त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. मलायकाने अभिनेत्री, निर्माती म्हणून इंडस्ट्रीत काम केले आहे. याशिवाय तिने अनेक कार्यक्रमांसाठी होस्ट आणि परीक्षक म्हणूनही भूमिका बजावली आहे. वयाच्या 20 व्या वर्षी तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आणि दिल से या चित्रपटातील छैया छैया या गाण्यामुळे ती स्टार झाली होती. तर अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे तो अलिकडेच 'संदीप और पिंकी फरार' आणि 'सरदार का ग्रँडसन' या चित्रपटात झळकला होता. 'भूत पुलिस' आणि 'एक विलन रिटर्न्स' हे त्याचे आगामी चित्रपट आहेत.

बातम्या आणखी आहेत...