आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात  :अर्जुन कपूरने पंतप्रधान केयर्स फंड आणि मुख्यमंत्री मदत निधी व्यतिरिक्त आणखी तीन संस्थांना केली मदत  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता या यादीत अभिनेता अर्जुन कपूरच्या नावाचा समावेश झाला आहे.

भारतावर ओढवलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाच्या काळात अनेक सेलिब्रिटी पुढे येऊन गरजूंना मदतीचा हात देत आहेत. आता या यादीत अभिनेता अर्जुन कपूरच्या नावाचा समावेश झाला आहे. अर्जुनने पीएम केयर्स फंड, महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीसह गिव इंडिया, द विशिंग फॅक्टरी आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज ऑफ बॉलिवूड (एफडब्ल्यूआयसीई) मध्ये योगदान देऊन अधिकाधिक लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.

अर्जुनने केली घोषणा : अर्जुनने आपल्या सोशल मीडियावर याची घोषणा केली. तो म्हणाला की, भारत एक संकटाचा सामना करत आहे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या गरजू सहकारी बंधू-भगिनींसाठी आपण थोडे प्रयत्न केले पाहिजेत. माझ्या वतीने योगदान देऊन जास्तीत जास्त लोकांना मदत करण्यासाठी मी सर्व प्रयत्न करत आहे.
 
नोकरी गमावलेल्या किंवा लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचा स्रोत नसलेल्या दैनंदिन वेतन मिळवणार्‍यांना रोख रक्कम देण्याच्या दिशेने गिव इंडिया सतत काम करत आहे.

चाहत्यांना केले आवाहन: त्याचप्रमाणे, विशिंग फॅक्टरी कमी उत्पन्न असलेल्या थॅलेसिमियाच्या रुग्णांनासाठी उल्लेखनीय काम करत आहे. जेणेकरुन लॉकडाऊनच्या काळात त्यांना ब्लड ट्रान्सफ्यूजनची सुविधा मिळून शकेल. कारण ब्लड ट्रान्सफ्युजनचा आवश्यक सेवांच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेला नाही. 
इतकेच नव्हे तर अर्जुनने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूआयसीई) च्या सहकार्याने आपल्या इंडस्ट्रीसाठी मदत करण्याच्या दिशेने हात पुढे केला आहे. तो म्हणतो की, या लोकांविना चित्रपटाची निर्मिती किंवा शूटिंग होऊ शकत नाही, एफडब्ल्यूआयसीई हा माझ्या इंडस्ट्रीची कणा आहे. आम्ही सर्वांना आपल्या कुटुंबाप्रमाणे मानतो.
अर्जुनने इतरांनाही पुढे येऊन अधिकाधिक लोकांना मदत करण्याची विनंती केली आहे. तो म्हणाला, "आम्ही एकजूट होऊ, तरच आपण कोविड -19 सोबत लढू शकतो. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्ही पुढे यावे आणि आपल्या क्षमतेनुसार मदत करावी. "

बातम्या आणखी आहेत...