आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट होत असतात. नुकतेच हे कपल डिनर डेटवर गेले होते, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका अर्जुनसोबत कारमधून उतरताना दिसत आहे. लूकबद्दल बोलायचे झाले तर मलायका नेहमीप्रमाणे खूप स्टायलिश दिसली. तिने व्हाइट डेनिमसह क्रॉप शर्ट घातला होता, तर अर्जुन राखाडी रंगाच्या हुडीमध्ये दिसला. मलायका आणि अर्जुनचा हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला असून ते दोघांच्या केमिस्ट्रीचे कौतुक करत आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मलायका अरोरा सध्या तिच्या 'मूव्हिंग इन विथ मलायका' या शोमुळे चर्चेत आहे. मलायका अरोराचा हा शो 5 डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अर्जुन कपूर 'कुत्ते' या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट पुढील वर्षी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. पाहा व्हिडिओ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.