आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिलेशनशिप:मलायका अरोरासोबत लग्नाच्या प्रश्नावर अर्जुन कपूर म्हणाला - आता करायचे जरी असेल तर ते कसे शक्य होईल?

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्षभरापूर्वी मलायका आणि अर्जुन यांनी आपले नाते सार्वजनिक केले आहे.

अभिनेता अर्जुन कपूर गुरुवारी आपल्या काही चाहत्यांसोबत व्हर्जुअल डेटवर गेला होता. यातून जमा झालेला निधी 300 रोजंदारी मजुरांच्या रेशनसाठी देण्यात येणार आहे. याशिवाय त्याने एका एंटरटेन्मेंट वेबसाइटच्या लाइव्ह चॅटमध्येही सहभाग घेतला होता. ज्यात त्याने आपल्या काम आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली. या संभाषणात एका चाहत्याने त्याला त्याच्या आणि मलायका अरोराच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला ज्याचे त्याने अतिशय रंजक पद्धतीने उत्तर दिले.

  • अर्जुन म्हणाला- आता लग्न कसे करणार?

अर्जुन उत्तर देताना म्हणाला, "जेव्हा मी माझे लग्न करीन, तेव्हा मी तुम्हाला सर्व सांगेन. सध्या तरी त्यासाठी कोणतीही योजना नाही." तो पुढे म्हणाले, "जरी आम्ही लग्न केले तरी ते याकाळात कसे शक्य आहे? मी आता याची योजना आखत नाही आणि त्याबद्दल विचार करत नाही. परंतु मी नेहमी म्हणतो की याविषयी मी काहीही लपवणार नाही."

  • लग्नाच्या प्रश्नावर यापुर्वी देखील प्रतिक्रिया दिली

गेल्या वर्षीदेखील अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाबद्दल ब-याच शक्यता वर्तवल्या गेल्या होत्या. तेव्हा अर्जुनने एका मुलाखतीत सांगितले होते, "नाही, मी लग्न केलेले नाही, माझे वय 33 वर्षे आहे आणि लग्न करण्याची मला घाई नाही. जर माझे लग्न झाले तर लोकांना कळेल. आजकाल, एका ठराविक कालावधीनंतर आपण काहीही लपवू शकत नाही. शक्यता वर्तवण्यात गैर काही नाही. पण आता मला कशावरही प्रतिक्रिया द्यायची नाही. सतत प्रतिक्रिया देणेही त्रासदायक होते. या विषयावर गरजेपेक्षा जास्त गॉसिप झाले आहे. पण माझ्या मनात कुणाबद्दलही कटुता नाही." या मुलाखतीत अर्जुनने मलायका त्याच्यासाठी खास असल्याचे सांगितले होते. 

  • मलायकाने शेअर केला आहे तिच्या लग्नाचा प्लान

नोव्हेंबर 2019 मध्ये मलायकाने अर्जुनबरोबर तिच्या लग्नाचा प्लान शेअर केला होता. नेहा धुपियाच्या शो 'नो फिल्टर नेहा 4' मध्ये मलायका म्हणाली होती, "आमची व्हाइट वेडिंग सेरेमनी (ख्रिश्चन रीति रिवाजानुसार) समुद्रकिना-यावर असेल. मला कायमच ब्राइड्समेड्सची संकल्पना आवडते. माझ्या जवळच्या मैत्रिणी त्यात सहभागी झालेल्या असतील."  अर्जुन प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असल्याचे ती म्हणाली होती. हे दोघे बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. पण सुमारे एक वर्षभरापूर्वी त्यांनी आपले नाते सार्वजनिक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...