आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा प्रेग्नन्सीबाबत अफवा पसरवणा-यांवर चांगलाच भडकला आहे. मीडिया पोर्टल आणि रिपोर्टरचे नाव घेऊन त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याचे धाडस करू नका, असे अर्जुन म्हणाला होता. आता पुन्हा एकदा त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत कर्माविषयी बोलला आहे.
कर्माची कायम परतफेड होत असते
अर्जुनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'कर्माची कायम परतफेड होत असते. एखाद्याचे आयुष्य उध्वस्त करून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तुम्ही कोण आहात याची मला पर्वा नाही, पण तुम्ही जे करता तसेच तुम्हाला परत मिळेन. हे जग असेच चालते. आज ना उद्या ब्रम्हांड तुम्हाला तुमच्या कर्माची फळं देणारच.' असा अप्रत्यक्ष टोला अर्जुनने खोट्या बातम्या पसरवणा-यांना लगावला आहे.
नेमके काय घडले होते?
पिंकव्हिलाने मलायका गरोदर असल्याची बातमी दिली होती. मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असून ही गूड न्यूज त्यांनी नातेवाईकांना दिली असल्याची बातमी पिंकविलाने म्हटले होते. अर्जुन कपूरने या बातमीचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत आपला संताप व्यक्त केला होता.
आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याची हिंमत करू नका
"अगदी खालच्या थराला जाऊन तुम्ही ही बातमी दिली. यातून असंवेदनशील आणि अनैतिकपणा दिसतो. अशा बातम्या सातत्याने लिहिल्या जात आहेत. आम्ही अनेकदा या बातम्यांकडे दुर्लक्ष करतो. हे योग्य नाही. आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करु नका," असे अर्जुन म्हणाला.
मलायकाने देखील अर्जुन कपूरची ही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत खोटी बातमी देणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे," असे तिने म्हटले.
अर्जुनने 2019मध्ये केली होती रिलेशनशिपची घोषणा
अर्जुन-मलायका गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2019 मध्ये अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया पोस्ट शेअर करून दोघांनी त्यांचे नाते अधिकृत केले होते. तेव्हापासून दोघेही अनेकदा रोमँटिक डेट आणि व्हेकेशनवर दिसले. हे दोघे 2023 मध्ये लग्न करू शकतात, अशी चर्चा आहे. पण अद्याप दोघांनाही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.