आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक व्हिलन 2:अर्जुन कपूरने बॉडी मेकओव्हरसाठी घेतले जागतिक किक बॉक्सिंग चॅम्पियन ड्रू नीलकडून ट्रेनिंग, त्याचा चित्रपटात दिसेल रिझल्ट

अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्जुन म्हणतो हा सगळा मनाचा खेळ आहे

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर लहानपणापासूनच आपल्या लठ्ठपणाशी झगडत होता. पण आता तो बदललेले दिसतो. यामागील कारण अर्जुनने एका मुलाखतीत उघड केले आणि संभाषणादरम्यान त्याने सांगितले की, योग्य शरीर मिळवण्यासाठी त्याला जागतिक किक बॉक्सिंग चॅम्पियन ड्र्यू नीलची मदत मिळाली. याबद्दल बोलताना अर्जुन म्हणतो, "मी लठ्ठपणामुळे ग्रस्त होतो आणि त्याचा रोज मनावर कसा परिणाम होतो हे मला माहीत आहे. मला बहुतेक लोकांपेक्षा जास्त मेहनत करावी लागली आणि हिंदी चित्रपटाचा नायक म्हणून काम करत असताना तशी फिजिक मिळवण्यासाठी दुप्पट कसरत करावी लागते."

अर्जुन म्हणतो हा सगळा मनाचा खेळ आहे

अर्जुन पुढे म्हणतो, "मला नवीन गोष्टी करून पहायला आणि अनुभवी प्रोफेशनल्सकडून प्रशिक्षण घ्यायला आवडते, म्हणून मी ड्रू नीलला भेटलो, जो सर्वकाही चांगले करतो. तो माझ्या आरोग्यासाठी परिपूर्ण प्रशिक्षक आहे. नीलसाठी प्रत्येक दिवस ट्रेनिंगचा दिवस असतो. काही काळानंतर तुम्हाला समजतं की हा सर्व मनाचा खेळ आहे आणि तुम्ही जितके जास्त त्यावर लक्ष केंद्रित करता तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळतील."

अर्जुनने त्याच्या ट्रेनिंग संबंधित काही खास गोष्टी शेअर केल्या

अर्जुन म्हणाला, "हे देखील स्वीकारावे लागेल की कधीकधी तुमच्या मार्गात स्पीड ब्रेकर आणि अडथळे असतात, तुम्हाला वाईट दिवसही बघावे लागतात. आणि तुम्ही कामामुळे काही दिवस ट्रेनिंग घेऊ शकत नाही, कधी कधी तुम्ही आजारी पडता, किंवा काही अयोग्य खाता. काही गोष्टी असू शकतात ज्या तुमच्या नियंत्रणात नसतात. जसे तणाव, थकवा किंवा प्रवास. हे सर्व लक्षात ठेवून ते तुम्हाला चांगले आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहित करतात. कारण ही केवळ 1 तास जिममध्ये वेळ घालवण्याची गोष्ट नाही. कारण पुढचे 23 तास तुम्ही जिमच्या बाहेर घालवता. "

अर्जुनने खुलासा केला की, त्याने आपले मन बळकट करण्यासाठी ड्रू बरोबर काम केले आहे जेणेकरून तो त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करू शकेल. अर्जुन आणि ड्रूची मेहनत अर्जुनच्या पुढील चित्रपट 'एक व्हिलन 2' मध्ये दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...