आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Arjun Kapoor Shared His Bad Experience Of Being Corona Positive, Said 'Used To Eat Food In Disposable Plate, , I Used To Have Very Bad Thoughts'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाशी लढा देण्याची कहाणी:अर्जुन कपूरने सांगितली आपबिती, म्हणाला - 'डिस्पोजेबल प्लेट्समध्ये जेवायचो, मनात सतत वाईट विचार येत होते'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्जुन म्हणाला - बरा झाल्यानंतर मी सतर्क झालाे, कोरोना पुन्हा होणार नाही, याची खबरदारी घेतोय

अर्जुन कपूर नुकताच कोरोनातून बरा होऊन कामावर परतला आहे. कोरोना झाल्यानंतर तो कसा सावरला याविषयी त्याने एका मुलाखतीत सांगितले...

कोरोना आपल्याला होणार नाही, असे काही लोक विचार करत असतील तर त्यांना मी माझा अनुभव सांगत आहे. माझा अहवाल येताच मी खूप गोंधळलो होतो. हा अहवाल आल्यानंतर मला कळाले, कोरोना खूपच धोकादायक आहे. कोरोना झाला हे स्वीकारण्यास मला सहा ते आठ तास लागले. मला खूप सौम्य लक्षणे होती, म्हणून सर्व काही ठीक झाले.

त्यावेळी नशिबाने अंशुला घरी होती. तिने माझ्या आयसोलेशनची तयारी केली. मी माझ्या खोलीतच माझे भांडे आणि वॉशरूम स्वच्छ करायचो. डिस्पोजेबल प्लेट्समध्ये जेवण करत होतो आणि व्हिडिओ कॉलिंगने डाॅक्टरला बोलत होतो.

मला लवकरात लवकर बरं व्हायचे होते. माझा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच मी कामावर रूजू होणार होतो. तेव्हा सप्टेंबर महिना होता आता ऑक्टोबर संपत आला आहे. आता मी बरा झालो आहे. कोरोनामुळे 21 दिवस वाया गेले, पण जीव महत्त्वाचा. मात्र आता मी खूपच खबरदारी घेत आहे. पुन्हा आजारी व्हायचे नाही आणि मला पुन्हा कोरोना रुग्ण व्हायचे नाही. जे तरुण मला कोरोना होणार असे म्हणत असतील तर ते फार मोठी चूक करत आहेत, एवढेच मी त्यांना सांगेन.