आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हॅप्पी बर्थडे:अर्जुन रामपाल आणि गर्लफ्रेंड गेब्रिएला डेमेट्रिड्सने मुलगा अरिकच्या वाढदिवशी चाहत्यांना दिले गिफ्ट, पहिल्यांदा शेअर केली छोट्या रामपालची झलक 

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्जुन रामपाल आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा मुलगा अरिक आज एक वर्षाचा झाला आहे. या खास प्रसंगी अभिनेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखविला. यापूर्वी अर्जुन आणि गेब्रिएला यांनी अरिकची छायाचित्रे शेअर केली होती पण कोणत्याही फोटोमध्ये त्याचा चेहरा दिसला नव्हता. आता या दोघांनीही त्याच्या पहिल्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे.

अर्जुन रामपालने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अरिकची बरीच छायाचित्रे शेअर केली. अभिनेत्याने त्याच्याबरोबर लिहिले की, 'आता अरिकच्या पहिल्या वाढदिवशी त्याचे प्रेम इंस्टा फॅमिलीसोबत शेअर करण्याची वेळ आली आहे. एवढे धैर्य ठेवण्यासाठी आणि आम्हाला प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. भेटा छोट्या रामपालाला. हॅप्पी बर्थडे माय बॉय !

याशिवाय अर्जुन कपूरने आपली मोठी मुलगी माहिकाने तयार केलेला एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यात छोट्या अरिकची चालणे, खेळणे आणि हसणे या गोष्टींची सुंदर झलक आहे. हे सांगत अभिनेताने लिहिले, माझ्या बाळा, या व्हिडिओसाठी थँक्यू माझी सुपर टॅलेंटेड माहिका रामपाल.

2018 मध्ये गेब्रिएलासोबत भेट 

अर्जुन रामपालची 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मॉडेल गेब्रिएलाशी भेट झाली. काही दिवसांनंतर दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. 2019 मध्ये गॅब्रिएलाने मुलगा अरिकला जन्म दिला. लग्न न करता मूल झाल्यावर अर्जुन खूप चर्चेत आला. यापूर्वी अर्जुनने 1998 मध्ये मेहर जेसियाशी लग्न केले होते. त्या दोघांना दोन मुली आहेत. 20 वर्षा चाललेल्या विवाहानंतर 28 मे 2018 रोजी दोघे विभक्त झाले. पहिल्या पत्नीपासून विभक्त असूनही अर्जुन आपल्या दोन्ही मुलींशी अगदी जवळ आहे.

View this post on Instagram

Happy anniversary baby ❤️

A post shared by Arjun (@rampal72) on Jul 8, 2020 at 6:02am PDT