आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NCB अधिका-याचा खुलासा:ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या अर्जुन रामपालच्या जबाबात अंतर, NCBचे विभागीय संचालक म्हणाले - अर्जुनला पुन्हा चौकशीसाठी बोलवू शकतो

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्जुनच्या घरातून एनसीबीला ट्रामाडॉल या औषधांच्या गोळ्या सापडल्या होत्या.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) अभिनेता अर्जुन रामपालची आतापर्यंत दोनदा चौकशी केली आहे. ताज्या रिपोर्टनुसार त्याला एनसीबीकडून पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले जाण्याची शक्यता आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "दोनदा झालेल्या चौकशीमध्ये अर्जुन रामपालच्या जबाबात फरक आढळून आला आहे. आम्ही त्याचा तपास करत आहोत. गरज पडल्यास आम्ही त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलवू शकतो."

दोनदा झाली आहे अर्जुन रामपालची चौकशी

एनसीबीने 9 नोव्हेंबर रोजी अर्जुनच्या घरावर एनसीबीने छापा टाकला होता. 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी अर्जुनची लिव्ह इन पार्टनर ग्रॅब्रिएला डेमेट्रियड्सची चौकशी झाली होती. याशिवाय अर्जुनच्या कार चालकालाही एनसीबीने ताब्यात घेतले होते. एनसीबीने अर्जुनच्या घरातून काही मोबाइल फोन आणि लॅपटॉप जप्त केले होते.

13 नोव्हेंबर रोजी तब्बल सात तास अर्जुनची पहिल्यांदा चौकशी झाली होती. 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या चौकशीदरम्यान अर्जुनने एनसीबीला सहकार्य केल्याचे सांगितले गेले होते. मात्र त्याने दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याचे म्हटले जाते. म्हणून त्याला दुस-यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्याला 16 डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, वैयक्तिक कारण देत त्याने तपास यंत्रणेकडे 21 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती. त्यानुसार तो 21 डिसेंबर रोजी काही कागदपत्रे घेऊन चौकशीसाठी हजर झाला होता. अर्जुनच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स डिवाइसचे रिपोर्ट आल्यानंतर एनसीबीने त्याला दुस-यांदा समन्स बजावले होते. या रिपोर्टमधून काही महत्त्वाचे पुरावे एनसीबीच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. दुस-यांदा सहा तास अर्जुनला चौकशीला सामोरे जावे लागले होते.

अर्जुनच्या घरात सापडले होते बंदी असलेले औषध
अर्जुनच्या घरातून एनसीबीला ट्रामाडॉल या औषधांच्या गोळ्या सापडल्या होत्या. या औषधावर भारतात बंदी आहे. या टॅब्लेट ड्रग्ज प्रकारात मोडतात. दरम्यान, एनसीबीने अर्जुनच्या नातेवाईकाचा हवाला देत म्हटले की, अर्जुनने दिल्लीतील डॉक्टरांकडून सीडिटेव ड्रग क्लोजेपामचे बॅकडेट प्रिस्क्रिप्शन बनवून घेतले होते. हे प्रिस्क्रिप्शन रामपालच्या घरातून मिळाले आहे. हे औषध केवळ डॉक्टरांच्या निर्देशानुसार वैद्यकीय दुकानातून घेतले जाऊ शकते. एनसीबीने डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचा जबाब घेतला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या जबाबाचे डिटेल समोर आलेले नाहीत. मात्र या आधारे अर्जुनला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दीपिकाच्या ड्रग्ज चॅटमध्ये अर्जुन रामपालच्या नावाचा उल्लेख?
दीपिका पदुकोणचे ड्रग्ज चॅट उघडकीस आल्यानंतर एनसीबीने तिची चौकशी केली होती. दीपिकाच्या चॅटमध्ये ए नावाच्या व्यक्तीचा उल्लेख होता. ए अर्जुन रामपाल असू शकतो असा अंदाज वर्तवला गेला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser