आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाकड:कंगना रणौतसाठी मुलगा शोधतोय अर्जुन रामपाल; म्हणाला- मी सांगेल तिच्यासाठी कोणता मुलगा योग्य

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालने नुकतेच एका मुलाखतीत कंगना रणौतचे कौतुक केले आणि सांगितले की ती एक परिपूर्ण वधू आहे आणि एक चांगली अभिनेत्री देखील आहे. अर्जुन म्हणाला की, कंगनासाठी कोणता मुलगा योग्य आहे हे मी सांगेल. यासोबतच अर्जून रामपालने अभिनेत्रीसाठी योग्य मुलगा शोधायला सुरुवात केली आहे. अर्जुन म्हणाला की कंगना एक चांगली व्यक्ती आहे.

अर्जुनने केले कंगनाचे कौतुक
अर्जुन म्हणाला, "कंगना ही एक परिपूर्ण वधू आहे, एक चांगली अभिनेत्री आहे. ती ईश्वरनिष्ठ आहे आणि तिला योगाची आवड आहे. ती म्हणावी तितकी गंभीर किंवा तीव्र नाही. कंगनासाठी कोणता मुलगा योग्य आहे हे मी तुम्हाला सांगेल.

'धाकड' 20 मे रोजी होणार रिलीज
रजनीश घई दिग्दर्शित 'धाकड' या अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटात कंगनाव्यतिरिक्त अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता आणि शाश्वत चॅटर्जी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात कंगना एजंट अग्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 20 मे 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

अर्जुनचे आगामी प्रोजेक्ट्स
दुसरीकडे, अर्जुन रामपालबद्दल बोलायचे तर, तो शेवटचा दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्या 'पलटन'मध्ये सोनू सूद आणि जॅकी श्रॉफसोबत दिसला होता. 'धाकड' व्यतिरिक्त अर्जुन अब्बास मस्तानच्या 'पेंटहाऊस' मध्येही दिसणार आहे. याशिवाय त्याने 'मनी हीस्ट', 'थ्री मंकी' या वेबसीरिजच्या हिंदी रुपांतराचे शूटिंगही सुरू केले आहे. ज्याचे दिग्दर्शन अब्बास मस्तान करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...