आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन:अर्जुन रामपालच्या घरी NCB चा छापा, ड्रायव्हरला ताब्यात घेऊन चौकशी सुरु; काही दिवसांपूर्वीच मेहुण्याला झाली होती अटक

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीची धडक कारवाई सुरु...

बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची धडक कारवाई सुरु असून आता अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी धाड टाकण्यात आली आहे . तसेच या कारवाई दरम्यान अभिनेता अर्जुन रामपालच्या वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एनसीबीला कारवाईदरम्यान अर्जुनच्या घरात ड्रग्ज सापडले की नाही, याचा अद्याप खुलासा होऊ शकलेला नाही.

काही दिवसांपूर्वीच अर्जुनच्या मेहुण्याला झाली होती अटक

या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्सचा भाऊ अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक केलीहोती. दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला एनसीबीने लोणावळ्यातून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर आता अर्जुन रामपालच्या घरी धाड टाकण्यात आली आहे. दिव्य मराठीने 1 ऑक्टोबर रोजी अर्जुन रामपालच्या ड्रग्ज कनेक्शनविषयीची बातमी दिली होती.

दीपिकाच्या ड्रग्ज चॅटमध्ये अर्जुन रामपालच्या नावाचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता
गेल्या महिन्यात दीपिका पदुकोणचे ड्रग्ज चॅट उघडकीस आल्यानंतर एनसीबीने तिची चौकशी केली होती. दीपिकाच्या चॅटमध्ये ए नावाच्या व्यक्तीचा उल्लेख होता. ए अर्जुन रामपाल असू शकतो असा अंदाज वर्तवला गेला होता.

बातम्या आणखी आहेत...