आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग प्रोजेक्ट्स:अर्जुन रामपालच्या ड्रग्ज कनेक्शनचा 'द बॅटल ऑफ कोरेगाव'च्या शूटिंगवर परिणाम होणार नाही, निर्माते रमेश थेटेंचा खुलासा

किरण जैन7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • थिएटरनंतर ओटीटी वर रिलीज होईल चित्रपट

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चा तपास सुरू आहे. तपास यंत्रणा अर्जुन रामपालवर आपली पकड घट्ट करताना दिसत आहे. मंगळवारी एनसीबीने पुन्हा अर्जुन रामपालला समन्स बजावले होते. मात्र अर्जुनने वैयक्तिक कारण देत चौकशीला दांडी मारली आणि 21 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली आहे. 22 डिसेंबर रोजी तो एनसीबीसमोर हजर होईल.

अर्जुनच्या ब-याचशा भागाचे चित्रीकरण झाले आहे
एकीकडे अर्जुनच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, तर दुसरीकडे तो आपल्या आगामी 'द बॅटल ऑफ कोरेगाव' या बिग बजेट चित्रपटाचीही तयारी करत आहे. अलीकडेच त्याने आपल्या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक रमेश थेटे यांच्या म्हणण्यानुसार अर्जुनच्या ड्रग्ज केसचा चित्रपटावर अजिबात परिणाम होणार नाही.

दैनिक भास्करशी झालेल्या चर्चेदरम्यान रमेश म्हणाले, "या चित्रपटाचे शूटिंग अजून बाकी आहे जे आम्ही पुढील वर्षी सुरू करणार आहोत. ड्रग्ज प्रकरणात अर्जुनचे नाव समोर आल्यावर आम्हाला कोणतीही भीती वाटली नाही. चित्रपटातील अर्जुनच्या बहुतांश भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित भागाचे चित्रीकरण चित्रपटातील इतर कलाकारांसोबत असून ते व्हायचे आहे. त्यामुळे त्याला अगदी काही दिवस चित्रीकरणासाठी द्यावे लागतील. आम्हाला आशा आहे की तो लवकरात लवकर यातून बाहेर पडेल."

थिएटरनंतर ओटीटी वर रिलीज होईल चित्रपट
चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी रमेश यांनी सांगितले, "पुढील वेळापत्रकानुसार आम्ही फेब्रुवारी-मार्चमध्ये चित्रीकरण करणार आहोत आणि त्यानंतर पोस्ट प्रॉडक्शनसाठी सुमारे चार महिने लागतील. आम्ही सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये चित्रपट प्रदर्शित करू अशी शा आहे. हा एक मेगा बजेट चित्रपट आहे आणि म्हणूनच आम्हाला हा चित्रपटगृहातच प्रदर्शित करायचा आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यासाठी आहे. मल्टीप्लेक्समध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेऊ."

अर्जुनच्या घरात एनसीबीला बंदी असलेली औषधे सापडली
एनसीबीने 9 नोव्हेंबर रोजी अर्जुनच्या घरावर छापा टाकला होता. अर्जुनच्या घरी ट्रामाडॉल या औषधांच्या गोळ्या सापडल्या होत्या. या औषधावर भारतात बंदी आहे. या टॅब्लेट ड्रग्ज प्रकारात मोडतात. याबाबत अर्जुन रामपाल याला खुलासा करायचा होता. 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी अर्जुनची लिव्ह इन पार्टनर ग्रॅब्रिएला डेमेट्रियड्सची चौकशी झाली होती. याशिवाय अर्जुनच्या कार चालकालाही एनसीबीने ताब्यात घेतले होते. एनसीबीने अर्जुनच्या घरातून काही मोबाइल फोन आणि लॅपटॉपही जप्त केले होते. 13 नोव्हेंबर रोजी तब्बल सात तास अर्जुनची चौकशी झाली होती. 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या चौकशीदरम्यान अर्जुनने एनसीबीला सहकार्य केल्याचे सांगितले गेले होते. मात्र त्याने दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याचे म्हटले जाते. म्हणून त्याला 16 डिसेंबर रोजी दुस-यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र अर्जुनने वैयक्तिक कारण देत एनसीबीकडे 22 डिसेंबर पर्यंतची मुदत मागितली आहे.

बातम्या आणखी आहेत...