आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन-दिव्या दत्ताची पहिली झलक:कंगना रनोटनंतर आता 'धाकड'मधील अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ताचा फर्स्ट लूक आला समोर, फोटो शेअर करुन अर्जुन म्हणाला...

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'धाकड' 1 ऑक्टोबरला होणार रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटच्या आगामी धाकड या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. हा चित्रपट पहिला महिला अ‍ॅक्शन चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटात कंगना एका महिला गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर तिच्यासह अभिनेता अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यात आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील कंगनाचा फर्स्ट लूक समोर आला होता. आता अर्जुन आणि दिव्या यांचीही चित्रपटातील पहिली झलक समोर आली आहे.

चित्रपटात अर्जुन हा खलनायक बनला आहे, जो वेश्या व्यवसायाबरोबरच शस्त्रे व ड्रग्जची तस्करी करतो. त्याने या चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. पोस्टरमध्ये अर्जुन रफ आणि टफ लूकमध्ये दिसत आहे. पोस्टर शेअर करताना अर्जुन रामपालने लिहिले, 'सैतानाचे दुसरे नाव आहे रुद्रवीर... धाकड चित्रपट ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.' पोस्टरमध्ये अर्जुनच्या हातात बंदूक दिसत आहे.

दुसरीकडे ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या चित्रपटातील दिव्या दत्ताचा लूक सोशल मीडियावर रिव्हील केला आहे. या पोस्टरमध्ये दिव्या दत्त धीर गंभीर होऊन बसलेली दिसत आहे आणि तिचे केस मोकळे सोडलेले दिसत आहेत.

'धाकड' 1 ऑक्टोबरला होणार रिलीज
कंगनाने काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना रिलीज डेट जाहीर केली होती. तिने लिहिले होते, "ती निर्भय आणि उग्र आहे, ती एजंट अग्नी आहे. भारताचा पहिला महिला अॅक्शन थ्रिलर 'धाकड' 1 ऑक्टोबर 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल."

सध्या मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये 'धाकड' चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...