आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) अर्जुन रामपालची बहीण कोमल रामपाल यांन ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी दुस-यांदा समन्स बजावले आहे. त्यानंतर कोमल चौकशीसाठी एनसीबीच्या ऑफिसमध्ये दाखल झाल्या आहेत. यापूर्वी 6 जानेवारीला एनसीबीने त्यांना समन्स बजावले होते, मात्र कोमल यांनी त्यावेळी चौकशीला दांडी मारली होती. त्यांनी वकिलांमार्फत चौकशीसाठी हजर राहू शकत नसल्याचे सांगितले होते. कोमल रामपाल NCB च्या चौकशी-तपासकार्यात असहकार्य करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
कोमल रामपालवर बनावट प्रिस्क्रिप्शन बनवल्याचा आरोप
अर्जुन रामपालच्या घरात एनसीबीने छापा टाकला होता. त्यावेळी त्याच्या घरातून जे प्रिस्क्रिप्शन एनसीबीच्या अधिका-यांना मिळाले आहे, ते अर्जुनच्या बहिणीच्या सांगण्यावरुन दिल्लीच्या मनोवैज्ञानिकाने तयार केल्याचे म्हटले जात आहे. एनसीबीने त्या डॉक्टराचा जबाब CRPC च्या कलम 164 अंतर्गत मॅजिस्ट्रेटसमोर नोंदवला होता.
अर्जुन रामपालची दोनदा झाली आहे चौकशी
21 डिसेंबर रोजी अर्जुन रामपालची NCBकडून चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी सुमारे 6 तास चालली. त्या दिवशी त्याला अटक होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण चौकशीनंतर अर्जुनला सोडून देण्यात आले होते. तत्पूर्वी NCBने त्याला 16 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले होते. पण अर्जुनने 22 डिसेंबरला वेळ मागितली होती. पण 21 डिसेंबरला अर्जुन चौकशीसाठी हजर झाला होता.
अर्जुन रामपालच्या घरातून ही औषधे ताब्यात घेण्यात आली
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) च्या चौकशीत अर्जुन रामपालने सांगितले होते की, त्याच्या घरातून जी औषधे जप्त केली गेली, ती त्याच्या कुत्र्यासाठी डॉक्टरांनी लिहून दिली होती. कारण त्याच्या कुत्र्याच्या जॉइंटमध्ये वेदना होत असतात. व्हेटरनरी डॉक्टरांनी ती औषधे प्रिस्क्राइब केली होती. एनसीबीच्या म्हणण्यानुसार छापेमारीमध्ये अभिनेत्याच्या घरातून अल्ट्रासेट टॅबलेट जप्त करण्यात आल्या आहेत. हे एक प्रिस्क्राइब औषध आहे, जे तीव्र वेदना दरम्यान वापरले जाते. दुसरे औषध क्लोनाजेपाम होते, हे औषध केवळ डॉक्टरांनी लिहून दिल्यास घेतले जाऊ शकते.
अर्जुनच्या मेहुण्याला झाली होती अटक
एनसीबीकडून अर्जुन रामपालशिवाय त्याची लिव्ह इन पार्टनल ग्रॅबिएला डेमेट्रियड्स हिची देखील याप्रकरणी दोनदा चौकशी केली होती. तपास यंत्रणेने ग्रॅबिएलाचा भाऊ गिसियालोस डेमेट्रियड्स याला अटकदेखील केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.