आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Arpita Khan Eid Bash: Salman Khan, Kangana Ranaut, Sidharth Malhotra, Kiara Advani Ranveer Singh, Deepika Padukone, Shehnaaz Gill Make It A Starry Affair

अर्पिता खान ईद बॅश:सलमानच्या ईद पार्टीत सेलेब्सची मांदियाळी, रणवीर-दीपिका, सिद्धार्थ-कियारा आणि कंगनासह अनेकांची हजेरी

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा खास फोटो आणि व्हिडिओज...

मंगळवारी (3 मे) जगभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हा सण उत्साहात साजरा केला. यावेळी सलमान खानने बहीण अर्पिता खान शर्माच्या घरी ईद पार्टी दिली. अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मा यांनी ही पार्टी होस्ट केली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली.

कंगना, सिद्धार्थ, कियारा यांच्यासह हे सेलेब्स पोहोचले होते पार्टीत
कंगना रनोट, करण जोहर, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, मिका सिंग, करिश्मा कपूर, एकता कपूर, सुष्मिता सेन, हुमा कुरेशी, सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, शहनाज गिल, सुष्मिता सेन, तब्बू, हिमेश रेशमिया, जॅकलिन फर्नांडिस, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे, तुषार कपूर, वरुण शर्मा, मनीष मल्होत्रा, अंगद बेदी, नेहा धुपिया, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान, भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी, संजय कपूर आणि त्याची मुलगी शनाया कपूर, पुलकित सम्राट आणि त्याची गर्लफ्रेंड क्रिती खरबंदासह अनेक सेलिब्रिटींनी यावेळी हजेरी लावली. आता या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या पार्टीत सलमानची मोठी बहीण अलविराही पोहोचली
यावेळी अभिनेत्री तब्बू देखील अर्पिता खानच्या ईद पार्टीत सगभागी झाली होती. सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खान आणि त्याची मोठी बहीण अलविरा खानही पती अतुल अग्निहोत्री आणि मुलांसोबत पार्टीत पोहोचली. यंदा सलमान खानने त्याच्या घरी ईद पार्टीचे आयोजन केले नाही. दरवर्षी सलमान त्याच्या घरी ईद पार्टीचे आयोजन करतो.

बातम्या आणखी आहेत...