आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्शद वारसीचा 53 वा वाढदिवस:वयाच्या 14 व्या वर्षी हरवले होते आई-वडिलांचे छत्र, शिक्षण सोडून घरोघरी कॉस्मेटिक विकून केला होता उदरनिर्वाह

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्शदच्या आयुष्याचा हा प्रवास एवढा सोपा नव्हता.

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने 19 एप्रिल रोजी वयाची 53 वर्षे पूर्ण केली आहेत. 'मुन्नाभाई एमबीबीएस' मधील सर्किट असो किंवा 'गोलमाल' मधील माधव अर्शद वारसीने आपल्या उत्तम अदाकारीने प्रत्येक भूमिकेत जीव ओतला. पण अर्शदच्या आयुष्याचा हा प्रवास एवढा सोपा नव्हता.

19 एप्रिल 1968 रोजी मुंबईत अर्शद वारसीचा जन्म झाला. वयाच्या 14 व्या वर्षी अर्शदने आपल्या आईवडिलांना कायमचे गमावले. आईवडिलांच्या निधनानंतर त्याला आपल्या आयुष्यात खूप चढउतार बघावे लागले. जगण्यासाठी अर्शदने दहावीनंतर शिक्षण सोडून केवळ पैसे कमावण्यावर आपले लक्ष केंद्रित केले.

घरोघरी जाऊन विकले कॉस्मेटिक प्रॉडक्ट
शिक्षण सोडल्यानंतर अर्शदने सेल्समन म्हणून एका कॉस्मेटिक कंपनीमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. त्यावेळी त्याचे वय केवळ 17 वर्षे होते. नोकरी करत असताना डान्समध्ये त्याची रुची वाढू लागली. त्यानंतर त्याने डान्स करायला सुरुवात केली, त्याच्या नृत्य कौशल्यामुळे त्याला अकबर समी यांचा डान्स ग्रुप जॉइन करण्याची संधी मिळाली. हीच ती वेळ होती जेव्हा त्याला, 1987 मध्ये आलेले चित्रपट 'ठिकाना' आणि 'काश' ची गाणी कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली होती.

जया बच्चन यांनी ऑफर केला होता पहिला रोल
अनेक डान्स कॉम्पिटिशनचा भाग राहिल्यानंतर आणि जिंकल्यानंतर अर्शद एक प्रोफेशनल डान्स कोरिओग्राफर बनला होता. 1996 मध्ये आलेला 'तेरे मेरे सपने' हा चित्रपट अभिताभ बच्चन यांचे प्रॉडक्शन हाऊस एबीसीएलची निर्मिती होती. या चित्रपटासाठी टीमला मुख्य अभिनेता हवा होता. त्यावेळी जया बच्चन यांची नजर अर्शद वारसीवर पडली आणि त्यांनी या रोलची ऑफर अर्शदला दिली. 'तेरे मेरे सपने'तील 'आंख मारे' हे गाणे हिट ठरले होते. ज्यामध्ये अर्शदने उत्तम डान्स केला होता. पहिल्या चित्रपटानंतरच त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या आणि आज अर्शद इंडस्ट्रीतील उत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे.

अलीकडेच 'दुर्गामती'मध्ये झळकला अर्शद ​​​​​​​

अर्शद अलीकडेच भूमी पेडणेकर स्टारर 'दुर्गामती' या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. अर्शदने 2020 मध्ये ओटीटीवरदेखील पदार्पण केले. 'असुर' या वेब सीरिजमध्ये तो दिसला होता. वेब सीरिजच्या यशानंतर त्याचा आता दुसरा भागही बनत आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये या वेब सीरिजचे दुसरा भाग प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...