आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये आत्महत्या:प्रसिद्ध कलादिग्दर्शक राजू सापते यांची पुण्यात आत्महत्या, व्हिडिओ प्रसिद्ध करुन कामगार युनियनचे राकेश मौर्य यांना जबाबदार धरले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी...

चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक राजेश मारुती सापते यांनी पुण्यात आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी स्वत:चा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी कामगार संघटनेतील पदाधिकारी राकेश मौर्य यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राकेश मौर्य ब-याच काळापासून मानसिक छळ करत असून त्यामुळे निराश होऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजेश सापते यांनी व्हिडिओत सांगितले आहे.

व्हिडिओमध्ये राजेश सापते काय म्हणाले?
व्हिडिओमध्ये राजेश मारुती सपाते म्हणाले, "मी पूर्ण विचारांती हा निर्णय घेत आहे. मला गेल्या काही दिवसांपासून खूप मानसिक त्रास होतोय. कामगार संघटनेतील राकेश मौर्य मला खूप त्रास देत आहे. माझे कोणत्याही प्रकारचे पेमेंट थकित नाही. सर्व पैसे नियमित दिले गेले आहेत. माझ्याबाबतची कुठलीही कामगार संघटनेत तक्रार नाही. तरीही राकेश मौर्य युनियनच्या काही कामगारांमार्फत फोन करून त्यांच्याकडून वदवून घेत आहे की, राजू सापतेनी एका व्यक्तीचे दीड लाख रुपये दिलेले नाहीत. नरेश मेस्त्रींनी मी पूर्ण पैसे दिल्याचे सांगितले आहे. राजू दादा कधीही कुणाचे पैसे ठेवत नाहीत, असे नरेश यांनी सांगितले. असे असूनही राकेश मौर्य मला सतत त्रास देत आहे.'

राजेश पुढे व्हिडिओमध्ये म्हणाले, “सध्या माझ्याकडे पाच प्रोजेक्ट आहेत, मला त्यावर काम सुरु करायचे आहे. पण, मला काल झीचा एक प्रोजेक्ट सोडावा लागला. कारण राकेश मौर्य मला कामच करु देत नाहीये. तसेच दशमी क्रिएशन्सचेही काम सुरु केल्यानंतर राकेश मौर्यने ते थांबवले या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्येचा निर्णय घेतला आहे,' असे राजेश यांनी व्हिडिओत म्हटले आहे. सोबतच मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असेही ते शेवटी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...