आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्यात वितुष्ठ:आरती सिंह म्हणाली, 'भाऊ कृष्णा अभिषेक आणि मामा गोविंदा यांच्यातील वादाचा माझ्यावरही परिणाम झाला आहे, मामा आणि त्याचे कुटुंबीय माझ्याशी बोलत नाहीत'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कश्मिरा शाहच्या ट्विटवरून सुरु झाला होता वाद

बिग बॉसची माजी स्पर्धक आरती सिंह तिचा भाऊ कृष्णा अभिषेक आणि मामा गोविंदा यांच्यातील मतभेदांवर प्रथमच बोलली आहे. आरतीच्या म्हणण्यानुसार, कृष्णा आणि गोविंदा यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि त्याचा परिणाम तिच्यावरदेखील झाला. कारण गोविंदा आणि त्याचे कुटुंबीय तिच्याशी आता बोलतही नाहीत.

आरती एका मुलाखतीत म्हणाली, त्यांच्यामध्ये जे काही झाले आहे, त्याची शिक्षा मला देखील भोगावी लागत आहे. चिची मामा आणि त्याचे कुटुंबीय माझ्याशी बोलत नाहीत. दोन्ही पक्ष एकमेकांबद्दल काही ना काही बोलले आहेत. शेवटी आम्ही सगळे एकाच कुटुंबाचा भाग आहोत. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की, त्यांच्यातील वाद लवकराच लवकर संपुष्टात यायला हवेत. मी याबद्दल कृष्णाशी बोलले आणि आता मामा त्याला माफ करतो की नाही यावर सर्व काही अवलंबून आहे.

पुन्हा वाद का झाला?

कृष्णा आणि त्याच्या मामा-मामी यांच्यातील वाद तीन वर्षे जुना आहे. काही दिवसांपूर्वीच ‘द कपिल शर्मा शो’ या शोमध्ये गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबाने हजेरी लावली होती. त्या एपिसोडमध्ये काम न करण्याचा निर्णय कृष्णाने घेतला होता. यावर सुनीता संतापल्या होत्या आणि म्हणाल्या होत्या की, मला पुन्हा त्याचा चेहरा पाहायचा नाही. विशेष म्हणजे गेल्या वर्षीदेखील जेव्हा गोविंदा यांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्या एपिसोडमध्ये देखील कृष्णा दिसला नव्हता.

कृष्णाने मागितली होती माफी

मामी सुनीताच्या या बोलण्याने कृष्णा खूप दुखावला गेला होता. एका मुलाखतीत त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. तो म्हणाला होता, 'मला माहित आहे की मामी माझ्याबद्दल खूप काही बोलल्या आहेत. अर्थात मला वाईट वाटले आहे. पण मला वाटते की मामी माझ्यावर खूप प्रेम करतात आणि त्यामुळेच माझ्यावर रागावल्या आहेत. आता त्यांना माझा चेहरादेखील बघायचा नाहीये, यावरुन त्या किती रागावल्या आहेत, हे दिसतंय. तुम्ही ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांच्यावरच तुम्ही जास्त रागावता. आईवडील आपल्या मुलांवर चिडतात संतापतात तेव्हा ते असेच बोलतात,' असे तो म्हणाला.

पुढे कृष्णा म्हणाला, 'मी सांगू इच्छितो की माझे माझ्या मामा मामीवर खूप प्रेम आहे. मी त्यांची माफी मागू इच्छितो. मी अनेकदा प्रयत्न केला, पण त्यांनी माझी माफी स्वीकारली नाही. ते मला का माफ करु इच्छित नाहीत, हे मला कळत नाहीये. मी त्यांच्या मुलासारखा आहे. आमच्यात जे काही मतभेद आहेत, ते मी दूर करु इच्छितो. आणि मी हे अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. पण तरीदेखील भांडण सुरुच आहे. ख-या आयुष्यात मामा मामी मला माझ्या आईवडिलांच्या स्थानी आहेत.'

कश्मिरा शाहच्या ट्विटवरून सुरु झाला होता वाद
कृष्णा अभिषेक आणि गोविंदामध्ये यांच्यातील हा वाद त्यांच्या पत्नींमुळे सुरु झाला. कृष्णाची पत्नी कश्मिराने 2018 मध्ये केलेले एक ट्विट सुनिता यांना खटकल्याने त्यांच्यात वाद झाले आणि या दोन्ही कुटुंबीयांना एकमेकांशी संबंध तोडले. कश्मिराने तिच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘काही लोक पैशांसाठी नाचत होते.’ सुनीता यांना वाटले की हे ट्विट पती गोविंदासाठी आहे. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमधील तणाव वाढला. सुनीता सांगतात की, गेल्या तीन वर्षात वाद इतका वाढला आहे की आता त्याला विसरण्याचा किंवा कमी होण्याचा प्रश्नच येत नाही.

बातम्या आणखी आहेत...