आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्याचे पुनरागमन:अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड 2'मध्ये पुन्हा एकदा श्रीरामाच्या भूमिकेत दिसतील अभिनेते अरुण गोविल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीरामाच्या भूमिकेत अरुण यांना बघण्यासाठी उत्सुक आहे अक्षय

रामानंद सागर यांच्या गाजलेल्या 'रामायण' या मालिकेत भगवान रामच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते अरुण गोविल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर श्री रामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अरुण गोविल ओह माय गॉडच्या सिक्वेलमध्ये भगवान रामची भूमिका साकारणार आहे. 'OMG 2' ची निर्मिती अश्विन वर्दे आणि अक्षय कुमार करत आहेत, तर दिग्दर्शक अमित राय हे आहेत.

श्रीरामाच्या भूमिकेत अरुण यांना बघण्यासाठी उत्सुक आहे अक्षय
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अक्षय कुमार चित्रपटात अरुण गोविल यांना श्रीरामाच्या भूमिकेत बघण्यासाठी खूप उत्सुक आहे. श्रीरामाच्या भूमिकेसाठी अरुणपेक्षा अधिक परिचित दुसरा चेहरा नाही, असे अक्षयचे मत आहे. निर्मात्यांनी मिळून घेतलेला हा निर्णय आहे.

पंकज त्रिपाठी केंद्रस्थानी असतील
अक्षय कुमार व्यतिरिक्त, 'ओह माय गॉड 2' मध्ये पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट भारतीय शिक्षण व्यवस्थेवर आधारित असेल. चित्रपटाच्या शूटिंगसाठी क्रू 13 ऑक्टोबर रोजी उज्जैनला रवाना होणार होता, परंतु क्रूच्या तीन सदस्यांना कोविड -19 ची लागण झाल्याने शूटिंग 23 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.

रामायण या मालिकेतील रामाच्या भूमिकेसाठी रिजेक्ट झाले होते अरुण गोविल
अरुण गोविल सुरुवातीला या भूमिकेसाठी रिजेक्ट झाले होते. याचे कारण म्हणजे रामानंद सागर यांना त्यांची स्मोकिंगची सवय आवडली नव्हती. त्यांच्या मते, व्यसन असलेल्या व्यक्तीला रामाची भूमिका
देणार नाही, असे रामानंद सागर यांचे म्हणणे होते. मात्र अरुण गोविल यांनी त्यांना सिगारेटचे व्यसन सोडून देणार असल्याची हमी दिली होती. तरीदेखील रामानंद सागर यासाठी तयार झाले नव्हते. मात्र
लूक टेस्टमधील अरुण गोविल यांचे स्मितहास्य बघून रामानंद सागर यांना आपला हा निर्णय बदलावा लागला होता. अशा प्रकारे अरुण गोविल यांना ही भूमिका मिळाली होती.

अरुण यांचा चित्रपट प्रवास
अरुण गोविल यांचा जन्म 12 जानेवारी 1958 रोजी उत्तर प्रदेशातील राम नगर (मेरठ) येथे झाला. मेरठ विद्यापीठात शिकत असताना त्यांनी काही नाटकांत काम केले. त्यांचे टीनएज सहारनपुरात गेले.
अरुणच्या वडिलांची त्यांनी सरकारी नोकरी करावी अशी इच्छा होती पण अरुण यांना असे काहीतरी करण्याची इच्छा होती जे संस्मरणीय असेल. याच कारणास्तव बिझनेस करण्याचे स्वप्न घेऊन ते मुंबईत
आले आणि नंतर त्यांनी अभिनयाचा मार्ग निवडला.

छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर त्यांना मोठ्या पडद्यावर पहिली संधी 1977 मध्ये मिळाली. ताराचंद बडजात्या यांचा 'पहेली' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी 'सावन को आए दो' (1979), 'सांच को आंच नही' (1979), 'इतनी सी बात' (1981), 'हिम्मतवाला' (1983), 'दिलवाला' (1986), 'हथकडी' (1995) आणि 'लव कुश' (1997) सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका निभावली.

अरुण यांनी विक्रम बेताल, 'लव कुश' (1989), 'कैसे कहूं' (2001), 'बुद्धा' (1996), 'अपराजिता', 'वो हुए न हमारे' आणि 'प्यार की कश्ती में' यासारख्या अनेक गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...