आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख-गौरीला दिलासा नाहीच:आर्यनचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला, मंगळवारपर्यंत जेलमध्ये राहावे लागणार! उद्या सुनावणीची विनंती हायकोर्टाने फेटाळून लावली

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्यनचा तुरुंगातील मुुक्काम वाढला, पुढील मंगळवारी होणार सुनावणी

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज 20 ऑक्टोबर रोजी मुंबईतील एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर शाहरुखच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाकडून आदेशाची प्रत मिळताच आर्यनच्या खानच्या वतीने अ‌ॅड.सतीश मानेशिंदे आणि अ‌ॅड. अमित देसाई मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळण्याविरोधात अपील दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण वेळ निघून गेल्यामुळे हे शक्य झाले नाही. आर्यनच्या वकिलांनी आज सकाळी 10.30 वाजता पुन्हा जामीन अर्ज दाखल केला आहे.

आर्यनचा तुरुंगातील मुुक्काम वाढला, पुढील मंगळवारी होणार सुनावणी
याचिका स्वीकारल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर असेल. आर्यनच्या वकिलांनी उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जामीन याचिकेवर सुनावणी घेण्याची विनंती न्यायमूर्ती सांब्रे यांच्याकडे केली आहे. पण सांब्रे यांनी सुनावणीसाठी पुढील मंगळवारची म्हणजे 26 ऑक्टोबरची तारीख दिली आहे. त्यामुळे आर्यनला दिलासा मिळालेला नाही. आर्यनचा तुरुंगातील मुक्काम अजून वाढला आहे.

तुरुंगात अस्वस्थ आहे आर्यन
बुधवारी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला पुन्हा एकदा तुरुंगात पाठवले गेले. यामुळे आर्यन खूप अस्वस्थ असून कोणाशीही बोलत नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी शाहरुखने आर्थर रोड तुरुंगात जाऊन आर्यनची भेट घेतली. आर्यनच्या अटकेनंतर 19 दिवसांनी या पिता-पुत्राची भेट झाली. यावेळी वडिलांना बघून आर्यन ढसाढसा रडल्याचे समजते.

NCB चे पुढचे पाऊल काय असणार?
आर्यन खानच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर आता NCB चे पुढचे पाऊल काय असेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एनसीबीचे संपूर्ण लक्ष उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आहे. आर्यन खान आणि उर्वरित आरोपींनी उच्च न्यायालयात नव्याने जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो उत्तर देण्याची तयारी करत आहे. सूत्रानुसार, एनडीपीएस न्यायालयाचा आदेशही एनसीबीच्या उत्तराचा भाग असेल. विशेष म्हणजे सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडी आज संपत आहे.

आर्यनच्या वकिलाकडे आता फक्त एक आठवडा शिल्लक आहे
NDPS कोर्टात आर्यनचा जामीन फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकिलांकडे फक्त एक आठवडा शिल्लक आहे. या एका आठवड्यातच ते आर्यनला जामीन मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. खरेतर 1 नोव्हेंबरपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. यानंतर, न्यायालय 14 नोव्हेंबरनंतरच उघडेल. अशा परिस्थितीत, आर्यनच्या बेलसाठी फक्त 7 वर्किंग डेस म्हणजेच एका आठवड्याचाच कालावधी आहे.

बातम्या आणखी आहेत...