आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Aryan Drug Case: Tanisha Mukherjee Described Aryan's Arrest As Harrsment, Said 'Think Once, What Would You Do If This Happened To Your Own Child?'

आर्यन ड्रग केस:आर्यनच्या अटकेला तनिषा मुखर्जीने म्हटले छळ, म्हणाली - 'एकदा विचार करा, जर हे तुमच्या मुलासोबत घडले असते तर काय केले असते?'

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मुलाखतीमध्ये तिने आर्यनला झालेली अटक न्याय नसल्याचे म्हटले आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या मुलाच्या जामीन अर्जावर अद्याप निर्णय आलेला नाही. 8 ऑक्टोबर रोजी आर्यनचा जामीन अर्ज मुंबईच्या किला कोर्टात फेटाळण्यात आला होता, त्यानंतर त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. 13 ऑक्टोबर रोजी येथे सुनावणी झाली जी आजही सुरू राहील. दरम्यान आर्यनला जामीन मिळू नये यासाठी सोशल मीडियावर #NoBailOnlyJail हा हॅशटॅग ट्रेंड झाला, तर दुसरीकडे इंडस्ट्रीतील काही लोक आर्यनच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. आता या सेलेब्समध्ये तनिषा मुखर्जीचे देखील नाव सामील झाले आहे.

तनिषाने बॉम्बे टाइम्सला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आर्यनला झालेली अटक न्याय नसल्याचे म्हटले आहे. आर्यनला पाठिंबा देताना ती म्हणाली, ‘मला असे वाटत आहे की आर्यन खानचा छळ होत आहे. एका मुलाला मीडिया ट्रायलमध्ये अडकवले जात आहे. ही खरी पत्रकारिता नाही, हे खळबळजनक आहे आणिबॉलिवूडला टार्गेट केले जात आहे. दुर्दैवाने लोक कलाकारांवर टीका करत आहेत. स्टार किड्स असल्याचे फायदे आणि तोटे असल्याचे सांगत लोक स्टार्सबद्दल कठोर होत आहेत. त्यांच्यात दया नाही, हे स्पष्ट होते आहे,’ असे तनिषा म्हणाली.

पुढे तनिषा म्हणाली, ‘हा देश सर्वांचा आहे आणि या देशातील लोकांनी पुरावे पाहून आपले विचार मांडायला हवेत. लोकांनी जरा एकदा विचार करायला हवा, असे जर त्यांच्या मुलासोबत घडले तर? तेव्हा आपण काय करु? हा न्याय आहे का?’

हे सेलेब्स आर्यनच्या बचावासाठी आले पुढे

तनिषा मुखर्जीच्या आधी हृतिक रोशन, त्याची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान, आलिया भट्ट, सुनील शेट्टी, पूजा भट्ट, सोनू सूद, जॉनी लीव्हर, हंसल मेहता, तापसी पन्नू, झोया अख्तर, सुचित्रा कृष्णमूर्ती असे अनेक बॉलिवूड सेलेब्स शाहरुख खानच्या समर्थनार्थ पुढे आले.

ट्विटरवर ट्रेंड झाले #NoBailOnlyJail

आर्यनच्या जामीन अर्जावर 13 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान, हजारो सोशल मीडिया यूजर्स आर्यनच्या जामीनाविरोधात एकत्र आले आणि त्यांनी सोशल मीडियावर #NoBailOnlyJail हा हॅशटॅग ट्रेंड केला होता. आर्यनच्या जामीन अर्जावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...