आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Aryan Drug Case:Swara Bhaskar Came Out In Support Of Shahrukh Khan, Wrote The Whole Of India Resides In One Shahrukh, Maybe That's Why He Gets Caught In People's Circles

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण:स्वरा भास्करचा शाहरुखला पाठिंबा, कविता शेअर करत म्हणाली - '…एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है'

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारी स्वराने ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर करत शाहरुखला पाठिंबा दिला आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान मुलगा आर्यन खानच्या अटकेपासून ट्रोलरच्या निशाण्यावर आला आहे. आर्यनला 2 ऑक्टोबर रोजी कार्डिएला द इम्प्रेस क्रूझच्या हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीतून ताब्यात घेण्यात आले, त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली. आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडचे अनेक मोठे सेलेब्स शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाच्या समर्थनात पुढे आले आहेत, ज्यात आता स्वरा भास्करचे नावही सामिल झाले आहे.

सोमवारी स्वराने ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर करत शाहरुखला पाठिंबा दिला आहे. स्वराने प्रसिद्ध कवी अखिल कटयाल यांची एक कविता रिट्विट केली आहे. या कवितेत लिहिले आहे की “वो कभी राहुल है तो कभी राज, वो कभी चार्ली है तो कभी मॅक्स, सुरिंदर भी वो हॅरी भी वो, देवदास भी और वीर भी, राम, मोहन, कबीर भी। वो अमर है समर है। रिजवान, रहीम, जहांगीर भी। शायद इसलिए कुछ लोगों की हलक में फंसता है, कि एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है।” त्यांची ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

ही कविता रिट्वीट करत स्वराने जांभळ्या रंगाचे हार्ट इमोजी वापरले आहे. स्वरा शिवाय नीरज घयवानदेखील अखिल यांची कविता शेअर करताना लिहिले, 'बंधन है रिश्तों में, काटों की तारें हैं, पत्थर के दरवाज दीवारें, बेलें फिर भी उगती हैं और गुच्छे भी खिलते हैं और चलते हैं अफसाने, किरदार भी मिलते हैं, वो रिश्ते दिल, दिल, दिल थे। लव यू शाहरुख, दिल से।'

स्वरा भास्कर आणि नीरज घयवान यांच्याआधी हृतिक रोशन, त्याची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान, शेखर सुमन, रवीना टंडन, फराह खान, हंसल मेहता, अभिषेक कपूर, आलिया भट्ट, पूजा भट्ट, सुचित्रा कृष्णमुर्ती, जॉनी लिव्हर, तापसी पन्नू, ट्विंकल खन्नासह अनेक सेलिब्रिटींनी शाहरुख आणि गौरीच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...