आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचला शाहरुखचा मुलगा:पापाराझींकडे केले दुर्लक्ष, ट्रोलर्स म्हणाले - 'गरज नसताना अटीट्युड दाखवतोय'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वीच तो सोशल मीडिया स्टार बनला आहे. अलीकडेच आर्यनने एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. मात्र तेथून बाहेर पडल्यानंतर पापाराझींकडे दुर्लक्ष करत तो तेथून निघून गेला. त्यामुळे आर्यन आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

आर्यन खानने नुकतीच ‘ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली. यावेळी जावेद अख्तर, हुमा कुरेशी, राधिका आपटे, शबाना आझमी यांसारखे अनेक दिग्गज कलाकारही उपस्थित होते. या सर्व दिग्गज मंडळींनी तेथे उपस्थित असलेल्या मीडिया फोटोग्राफर्सना आनंदाने पोज दिल्या. पण आर्यन खान स्क्रिनिंगवरून आला आणि थेट आपल्या गाडीत जाऊन बसला. त्याने त्या मीडिया फोटोग्राफर्सना सपशेल दुर्लक्ष केले. त्याच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

आर्यनचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर नेटकरी कमेंट्स करत त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत काही नेटकऱ्यांनी आर्यनला 'तुझ्या वडिलांकडून काहीतरी शिक,' असा सल्ला दिला आहे. तर काहींनी 'आर्यन गरज नसताना अटीट्युड दाखवतोय,' असे म्हटले आहे. आर्यनचा हा व्हिडिओ आता चर्चेत आला आहे.

आर्यनने केली आहे पहिल्या चित्रपटाची घोषणा

आर्यनदेखील आता बी टाऊन इंडस्ट्रीत पाऊल ठेवतोय. पण तो पडद्यावर नव्हे तर पडद्यामागे काम करणार आहे. आर्यनने त्याच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. त्याचे लिखाणाचे काम पूर्ण झाले आहे. शाहरुखच्या रेड चिलीज या प्रोडक्शन हाऊसमधूनच आर्यन पदार्पण करत आहे. आर्यन या प्रोजेक्टद्वारे दिग्दर्शक म्हणून त्याच्या करिअरला सुरुवात करणार आहे. आर्यनने गेल्यावर्षी 6 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याच्या डेब्यू प्रोजेक्टची घोषणा केली होती. पोस्ट शेअर करताना आर्यनने लिहिले होते- 'लिखाण पूर्ण झाले आहे, आता केवळ अ‍ॅक्शन म्हणण्याची प्रतिक्षा आहे.' आर्यनने शेअर केलेल्या फोटोमध्ये टेबलवर एक स्क्रिप्ट ठेवण्यात आले असून त्यावर इंग्रजीत आर्यन खानसाठी असे लिहिले होते. शिवाय फोटोमध्ये एक क्लॅपर बोर्ड दिसला. ज्यावर शाहरुखची प्रोडक्शन कंपनी रेज चिलीज एंटरटेन्मेंट नाव आणि लोगो दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...