आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Aryan Khan Arrested: Sunil Shetty Came Ahead To Support Shahrukh Khan's Son Aryan, Said Give The Child A Chance And Wait For The Truth To Come Out

ड्रग्ज प्रकरणात अडकला आर्यन खान:शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या समर्थनार्थ पुढे आला सुनील शेट्टी, म्हणाला - 'त्या मुलाला एक संधी द्या आणि सत्य बाहेर येण्याची प्रतिक्षा करा'

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या पार्टीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला शनिवारी एनसीबीने ताब्यात घेतले. मुंबईतील एका क्रूझ शिपवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीतून एनसीबीने आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतले होते. शनिवारी संध्याकाळी ही कारवाई झाली. 22 तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतलेल्या सगळ्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली होती. दरम्यान, अभिनेता सुनिल शेट्टीने या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता सुनील शेट्टीने नुकत्याच झालेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. सुनील शेट्टी म्हणाला, "जेव्हा एखाद्या जागी धाड टाकण्यात येते, तेव्हा तिथे बरेच लोक असतात. म्हणून आम्ही असे गृहीत धरतो की या मुलाने ड्रग्ज घेतले, या मुलाने हे केले. मला वाटते की प्रक्रिया चालू आहे, म्हणून ती तशीच ठेवा आणि त्या मुलाला श्वास घेण्यास वेळ द्या. जेव्हा आमच्या इंडस्ट्रीत काहीही घडते, तेव्हा माध्यम लगेचच तुटून पडतात. प्रत्येकाला वाटते की हा देखील असाच असेल. त्या मुलाला एक संधी द्या आणि सत्य बाहेर येण्यासाठी प्रतिक्षा करा. तो अजून लहान आहे. तोपर्यंत त्याची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे.'

एनसीबीने मुंबईजवळील कॉर्डिएला द इम्प्रेस या क्रूझवर छापा टाकला होता, त्या पार्टीमध्ये सुमारे 600 हायप्रोफाइल लोक उपस्थित होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह 8 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यात 3 मुलींचा समावेश आहे. या पार्टीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.

बातम्या आणखी आहेत...