आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला:मुंबईच्या विशेष NDPS न्यायालयाचा आर्यन, अरबाज आणि मुनमुन यांना जामीन देण्यास नकार, जामिनासाठी आता उच्च न्यायालयात पोहोचले शाहरुखचे वकील

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्यनची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही 21 ऑक्टोबरला संपत आहे.
  • आर्यन खानला 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती आणि 8 ऑक्टोबरपासून तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळण्यात आला आहे. मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामिचा यांना जामीन देण्यास नकार दिला आहे.

विशेष एनडीपीएस न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देणार
दुसरीकडे विशेष न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खानचे वकील अमित देसाई, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. तर आर्यनसोबत अटकेत असलेली मुनमुन धमिचाचे वकील अली काशिफ खान हे देखील तिथे उपस्थित आहेत. आर्यन आणि मुनमुनचे वकील आता एनडीपीएस न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देत आहेत. कोरोनाच्या नवीन नियमांनुसार, उच्च न्यायालयात दाखल करायची सर्व कागदपत्रे 24 तासांसाठी क्वारंटाइन कक्षात पाठवली जातात. त्यामुळे त्यांच्या अर्जावर आज नव्हे तर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील स्पेशल NDPS कोर्टाच्या वीवी पाटील खंडपीठाने 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या दीर्घ युक्तिवादानंतर जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. वृत्तानुसार, एनसीबीला या प्रकरणात आर्यन खानसोबत एका नवोदित बॉलिवूड अभिनेत्रीचे चॅटदेखील मिळाले आहेत.

आर्यनचे अभिनेत्रीसोबतचे ड्रग चॅट जामिनामध्ये अडथळा आणू शकतात
NCB हाती लागलेल्या आर्यनच्या काही चॅटमध्ये तो एका नवोदित अभिनेत्रीसोबत ड्रग्जवर चर्चा करताना दिसतोय. 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान एनसीबीने ते पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर केले. असेही म्हटले जात आहे की ही अभिनेत्री क्रूझवर उपस्थित होती आणि सुरुवातीला एनसीबीने तिला सोडून दिले होते. येत्या काळात या अभिनेत्रीची एनसीबी टीमकडून चौकशी केली जाऊ शकते. आर्यनचे अभिनेत्रीसोबतचे हे चॅट त्याच्या जामिनात मोठा अडथळा आणू शकते. ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय, जामिनावरील सुनावणीपूर्वी काही ड्रग पॅडलरसोबतचे आर्यनचे चॅटदेखील न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.

यापूर्वी, निकाल राखून ठेवताना न्यायाधीश पाटील म्हणाले होते की, ते 20 ऑक्टोबरलाही व्यस्त आहेत, पण त्या दिवशी जामिनावर सुनावणी घेण्याचा ते प्रयत्न करतील. म्हणूनच असे मानले जाते की सुरुवातीला न्यायाधीश या निर्णयाचा केवळ ऑपरेटिव्ह भाग सादर करतील. 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आलेला आर्यन 8 ऑक्टोबरपासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यनला तुरुंगात कैदी क्रमांक 956 चा बॅच मिळाला आहे. आर्यनची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही 21 ऑक्टोबरला संपत आहे.

आर्यनच्या बाबतीत NCB ने सुरुवातीला ड्रग्ज सेवनासाठीचा गुन्हा दाखल केला होता, त्यांनी 27, 28 आणि 29 कलम लागू केले होते. कलम 28 हे सेवन करण्याचा प्रयत्न आहे, कलम 29 हे ड्रग्ज सेवन करण्याचे षडयंत्र आहे आणि कलम 27 हे ड्रग्जच्या सेवनासाठी लावले जाते.

आरोपी आणि एनसीबीच्या वतीन बाजू मांडणारे वकील कोण आहेत?
एएसजी अनिल सिंग हे प्रकरण एनसीबीच्या वतीने पाहत आहेत आणि त्यांना वकील श्रीराम शिरसाट मदत करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयात रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणातदेखील शिरसाट हे अनिल सिंह यांना मदत करत होते. एसपीपी अद्वैत सेठना हेही एनसीबीचे प्रतिनिधित्व करत आहेत.

वरिष्ठ वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई हे आर्यनची बाजू मांडत आहेत. अशा प्रकरणांमध्ये दोघेही मुंबईचे दिग्गज वकील मानले जातात. मानेशिंदे यांनी सुशांत ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि देसाई यांनी हिट अँड रन प्रकरणी सलमानला दिलासा मिळवून दिला होता. हेच कारण आहे की 14 ऑक्टोबरच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंमध्ये मोठा युक्तिवाद झाला होता. मात्र, आजच्या निकालापूर्वी न्यायालयात युक्तिवाद किंवा उलटतपासणी होणार नाही. यात कोण वरचढ ठरणार हे आजचा निकाल ठरवेल.

जामिनाविरोधात एनसीबीचा युक्तिवाद
यापूर्वी, आर्यनच्या जामिनाला विरोध करताना अनिल सिंग म्हणाले होते की, रेकॉर्ड आणि पुरावे दर्शवतात की आर्यन गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे ड्रग्ज घेतोय. सरकारी वकिलांनी सांगितले की, आर्यन खूप प्रभावशाली व्यक्ती आहे आणि जर जामिनावर सुटला तर पुराव्यांशी छेडछाड करु शकतो किंवा कायद्यापासून पळवाट काढू शकतो. सिंग पुढे म्हणाले की, आर्यन आणि त्याचा मित्र अरबाज यांना ठोस पुराव्यांच्या आधारे अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज रॅकेटचे परदेशी संबंध तपासले पाहिजेत. हे एक मोठे षड्यंत्र आहे ज्याची चौकशी होणे आवश्यक आहे. आर्यन अरबाजकडून ड्रग्ज घेत असे, त्यामुळे त्याला जामीन देऊ नये. एनसीबीने न्यायालयात एक व्हॉट्सअॅप चॅट देखील सादर केला, आणि दावा केला की या चॅटच्या तपासात उघड झाले आहे की ड्रग्स प्रकरणात आर्यन खानची महत्वाची भूमिका आहे.

आर्यनच्या जामिनासाठी बचाव पक्षाने हा युक्तिवाद ठेवला
यापूर्वी 13 ऑक्टोबर रोजी झालेली सुनावणी सुमारे 3 तास चालली होती, परंतु युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नव्हता. या दरम्यान बचाव पक्षाने आर्यनला जामीन मिळावा म्हणून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) पंचनाम्यापासून ते आरोपींवर लावलेल्या कलमांवर युक्तिवाद केला, तर एनसीबीने जामिनाला विरोध दर्शवला आणि आपली बाजू मांडली. बचाव पक्ष म्हणाले की, आर्यनकडून कोणतेही ड्रग्ज जप्त करण्यात आले नाहीत. तसेच NCB ला कोणतीही रोख रक्कम मिळाली नाही. ज्या व्यक्तीने आर्यनला पार्टीसाठी आमंत्रित केले त्याला अटक झाली नाही. आर्यनचा मुनमुन धामेचाशी कोणताही संबंध नाही.

देसाई यांचा आरोप - आर्यनला जबाब देण्यास भाग पाडले गेले

आर्यनचे वकील अमित देसाई यांनी आर्यनच्या कबुलीजबाबाचे सक्तीचा जबाब म्हणून वर्णन केले आहे. देसाई म्हणाले की, एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यनने कबूल केले की तो अरबाजसोबत चरस घेणार होता, परंतु अशा गोष्टी कशा स्वीकार करायला लावल्या जातात, हे देखील न्यायालयाला माहित आहे.

बातम्या आणखी आहेत...