आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यनला जामीन नाही:किंग खानचा मुलगा आणखी 2 दिवस तुरुंगात घालवणार, NCBने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला; आता 13 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्यन आणि एनसीबीच्या वकीलांमध्ये जोरदार युक्तिवाद

क्रूझ ड्रग प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला दिलासा मिळालेला नाही. त्याला अजून पुढील दोन दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावर 13 ऑक्टोबर रोजी सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी शनिवारी विशेष एनडीपीएस न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आर्यनची बाजू मांडण्यासाठी हिट अँड रन प्रकरणात सलमान खानची बाजू मांडणारे वकील अमित देसाई न्यायालयात पोहोचले होते.

न्यायालयात देसाई म्हणाले की, या प्रकरणात आर्यन एकमेव अशी व्यक्ती आहे, जिच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज मिळालेले नाही. देसाई यांच्या युक्तिवादानंतर एनसीबीने न्यायालयात उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे. एनसीबीचे वकील एसपीपी चिमेलकर न्यायालयाला म्हणाले, "सामान्यत: एनसीबीला उत्तर दाखल करण्यासाठी एक आठवडा लागतो. देसाई यांनी मांडलेले तथ्य बरोबर नाहीत. आम्ही तपास कागदपत्रेही रेकॉर्डवर ठेवू. मला किमान 2-3 दिवसांचा वेळ द्या.'

आर्यन आणि एनसीबीच्या वकीलांमध्ये जोरदार युक्तिवाद
आर्यनचे वकील देसाई यांनी युक्तिवाद केला की, शुक्रवारी जामीन अर्ज दाखल केल्यानंतर एनसीबीकडे उत्तर देण्यासाठी दोन दिवस होते. या दरम्यान, ते सतत अटकेची कारवाई करत होते, जे मीडियाच्या अहवालांमध्ये पाहिले जाऊ शकते. यावर, एनसीबीचे दुसरे वकील एसपीपी सेठना म्हणाले की, या प्रकरणी कोणतीही निकड नाही. आम्हाला कालच जामीन अर्ज मिळाला. म्हणून आम्ही मागितलेले 2 दिवस न्याय्य आहेत. साधारणपणे आम्ही 7 दिवस मागतो.

आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांच्यासोबत शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी.
आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांच्यासोबत शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी.

या प्रकरणात रविवारी झाली 20 वी अटक
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने गोरेगाव येथून आणखी एका परदेशी नागरिकाला अटक केली आहे. तपास यंत्रणेने त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त केले आहे. एनसीबीने सांगितले की, आरोपी नायजेरियाचा नागरिक आहे. त्याचे नाव ओकारो औजामा आहे. एनसीबीच्या मते, हा परदेशी नागरिक ड्रग्ज प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यासह, क्रूझ ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 20 लोकांना अटक करण्यात आली आहे.

ड्रायव्हरचा जबाब आर्यनच्या विरोधात जाऊ शकतो
एनसीबीने शनिवारी शाहरुखच्या ड्रायव्हरची दीर्घ चौकशी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने कबूल केले आहे की, त्याने आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटला क्रूझ टर्मिनलवर सोडले होते. चालकाच्या जबाबाच्या आधारे, एनसीबी आर्यन खानच्या जामिनाला न्यायालयात विरोध करु शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या ड्रायव्हरने एनसीबीला सांगितले आहे की आर्यन खान, अरबाज मर्चंट, प्रतीक गाबा आणि अन्य एक व्यक्ती आर्यनचा बंगला मन्नत येथून एकत्र मर्सिडीज कारमधून निघाले होते. हे सर्व लोक एकत्र क्रूझ पार्टीसाठी बाहेर गेले होते. क्रूझ पार्टीच्या काही दिवस आधी, ड्रग्जबद्दल संभाषण देखील झाले, ज्याचे एनसीबीला पुरावे मिळाले आहेत.

आर्यन खानचा चौथा दिवस तुरुंगात
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 8 ऑक्टोबरपासून ड्रग्ज प्रकरणात आर्थर जेलमध्ये आहे. आर्यनला 2 ऑक्टोबर रोजी त्याचा मित्र अरबाज मर्चंटसह मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ शिपवर एनसीबीने ताब्यात घेतले होते. एनसीबीला आर्यनकडून कोणतेही ड्रग्ज मिळाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. आर्यनने चौकशीदरम्यान ड्रग्जचे सेवन करत असल्याची कबुली दिली होती. तर दुसरीकडे मित्र अरबाज मर्चंटने त्याच्या शूजमध्ये चरस लपवल्याची माहिती समोर आली होती.

बातम्या आणखी आहेत...