आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज प्रकरण:आर्यन खान तुरुंगात असल्यापासून शाहरुख-गौरीची झोप उडाली, मुलाच्या तब्येतीविषयी जाणून घेण्यासाठी दिवसातून अनेकदा करत असतात फोन

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 8 ऑक्टोबरपासून ड्रग्ज प्रकरणात आर्थर जेलमध्ये आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि त्याचे कुटुंबीय सध्या मोठ्या अडचणीचा सामना करत आहेत. आर्यन खानला 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली. तेव्हापासून तो कोठडीत आहे. मागील दहा दिवसांत आर्यनचा जामीन अर्ज तीनदा फेटाळण्यात आला आहे. सध्या तो आर्थर जेलमध्ये आहे. शाहरुखच्या एका जवळच्या मित्राने सांगितल्यानुसार, आर्यन तुरुंगात असल्याने शाहरुख आणि गौरी खान खचून गेले आहेत. दोघेही स्वतःला असाहाय्य समजत आहेत.

शाहरुखच्या निटवर्तीयाने सांगितल्यानुसार, 'शाहरुख सध्या फारच दु:खात आहे. तो नेहमीप्रमाणे जेवतही नसून पुरेशी झोपही घेत नाहीय. तो एखाद्या असहाय बापाप्रमाणे झाला आहे. त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.'

आर्यनच्या हेल्थ अपडेटसाठी दिवसातून अनेकदा फोन करतात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनच्या तब्येतीविषयी जाणून घेण्यासाठी शाहरुख आणि गौरी दिवसातून अनेक वेळा फोन करत असतात. शाहरुख आणि गौरीने काही दिवसांपूर्वी आर्यनला घरचे जेवण आणि त्याच्या काही वैयक्तिक वस्तू पाठवल्या होत्या. आर्यन खानच्या अटकेमुळे शाहरुख खानच्या व्यावसायिक जीवनावरही परिणाम झाला आहे. अभिनेत्याने त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय शूटिंग वेळापत्रकही रद्द केले आहे आणि दिग्दर्शक एटलीच्या चित्रपटाचे शूटिंगही पुढे ढकलण्यात आले आहे. तसेच एका एज्युकेशन ब्रँडने शाहरुख खानच्या जाहिरातीही तात्पुरत्या बंद केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी गौरी आर्यनच्या भेटीसाठी एनसीबीच्या ऑफिसमध्ये गेली होती, तिथून बाहेर पडल्यानंतर गौरीला अश्रू अनावर झाले होते. तिचा तो व्हिडिओदेखील सोशल मीडियावर समोर आला होता.

ड्रायव्हरचा जबाब आर्यनच्या विरोधात जाऊ शकतो
दुसरीकडे एनसीबीने शनिवारी शाहरुखच्या ड्रायव्हरची दीर्घ चौकशी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने कबूल केले आहे की, त्याने आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटला क्रूझ टर्मिनलवर सोडले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या ड्रायव्हरने एनसीबीला सांगितले आहे की आर्यन खान, अरबाज मर्चंट, प्रतीक गाबा आणि अन्य एक व्यक्ती आर्यनचा बंगला मन्नत येथून एकत्र मर्सिडीज कारमधून निघाले होते. हे सर्व लोक एकत्र क्रूझ पार्टीसाठी बाहेर गेले होते. क्रूझ पार्टीच्या काही दिवस आधी, ड्रग्जबद्दल संभाषण देखील झाले, ज्याचे एनसीबीला पुरावे मिळाले आहेत.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 8 ऑक्टोबरपासून ड्रग्ज प्रकरणात आर्थर जेलमध्ये आहे. आर्यनला 2 ऑक्टोबर रोजी त्याचा मित्र अरबाज मर्चंटसह मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ शिपवर एनसीबीने ताब्यात घेतले होते. एनसीबीला आर्यनकडून कोणतेही ड्रग्ज मिळाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. आर्यनने चौकशीदरम्यान ड्रग्जचे सेवन करत असल्याची कबुली दिली होती. तर दुसरीकडे मित्र अरबाज मर्चंटने त्याच्या शूजमध्ये चरस लपवल्याची माहिती समोर आली होती.

बातम्या आणखी आहेत...