आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दुसरीकडे, चाहते त्याचा मुलगा आर्यनच्या डेब्यू प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. आर्यन वेब सिरीजद्वारे दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरचा श्रीगणेशा करत आहे. त्याच्या डेब्यू प्रोजेक्टची स्क्रीप्ट लिहून तयार आहे. दरम्यान आर्यनची ही वेब सिरीज अनेक OTT स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म विकत घेऊ इच्छितात, असे वृत्त आहे. परंतु जोपर्यंत या सिरीजचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आर्यन कोणत्याही प्लॅटफॉर्मवर ती विकू इच्छित नाही.
आर्यनला कोणत्याही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला सिरीज विकायची नाही
बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, खान कुटुंबाच्या जवळच्या मित्राने खुलासा केला की, 'जोपर्यंत ही वेब सिरीज पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला आर्यन ही वेब सिरीज विकू इच्छित नाही.'
सर्वच OTT स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वेब सिरीज खरेदी करण्यास इच्छूक
खान कुटुंबाच्या जवळच्या एका सूत्राने पुढे सांगितले की, 'आर्यनला वेब सिरीज पूर्ण करण्यासाठी डेडलाइनचा दबाव नकोय. त्याचे संपूर्ण लक्ष सिरीज उत्कृष्ट बनवण्यावर आहे. त्याला ती त्याच्या पद्धतीने बनवायची असून त्यामध्ये स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा हस्तक्षेप त्याला नकोय.'
निकटवर्तीयाने पुढे सांगितले, 'जवळजवळ प्रत्येक लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आर्यनची ही वेब सिरीज खरेदी करण्यास इच्छूक आहे. तो शाहरुख खानचा मुलगा असल्यानेच हे घडत असल्याची कल्पना आर्यनला आहे. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करु इच्छिणाऱ्या आर्यनला त्याच्या वडिलांमुळे कुणाकडूनही स्पेशल ट्रीटमेंट नकोय.'
6 डिसेंबर रोजी केली होती डेब्यू प्रोजेक्टची घोषणा
आर्यनने गेल्यावर्षी 6 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याच्या डेब्यू प्रोजेक्टची घोषणा केली होती. पोस्ट शेअर करताना आर्यनने लिहिले होते- 'लिखाण पूर्ण झाले आहे, आता केवळ अॅक्शन म्हणण्याची प्रतिक्षा आहे.' आर्यनने शेअर केलेल्या फोटोमध्ये टेबलवर एक स्क्रिप्ट ठेवण्यात आले असून त्यावर इंग्रजीत आर्यन खानसाठी असे लिहिले आहे. शिवाय फोटोमध्ये एक क्लॅपर बोर्ड दिसतोय. ज्यावर शाहरुखची प्रोडक्शन कंपनी रेज चिलीज एंटरटेन्मेंट नाव आणि लोगो आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.