आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Aryan Khan Drug Case: At The Last Moment, Shahrukh Khan Refused To Shoot An Ad Film With Ajay Devgan, Sought Help From The Makers Till Aryan Got Bail

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण:शाहरुख खानने  शेवटच्या क्षणी अजय देवगणसोबत अ‍ॅड फिल्म शूट करण्यास दिला नकार, आर्यनला जामिन मिळेपर्यंत निर्मात्यांकडे मागितला वेळ

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्यनला जामिन मिळेपर्यंत शाहरुखने निर्मात्यांकडे वेळ मागितला आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कोठडीत आहे. दिग्दर्शक एटलीच्या आगामी अनटाइटल चित्रपटाचे शूटिंग शेड्युल याचकाळात निश्चित होते, मात्र शाहरुखने त्याचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर शूटिंग थांबवले आहे. आता बातमी आहे की, शाहरुखने अजय देवगणसोबत चित्रीत करण्यात येणारी एक कमर्शिअल अ‍ॅड करण्यास शेवटच्या क्षणी नकार दिला आहे. आर्यनला जामिन मिळेपर्यंत शाहरुखने निर्मात्यांकडे वेळ मागितला आहे.

ई टाईम्सच्या वृत्तानुसार, शाहरुख खान आणि अजय देवगण बुधवारी मुंबईत एका कमर्शिअल जाहिरातीचे शूटिंग करणार होते, मात्र किंग खानने या शूटिंगला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. शाहरुखने खरं तर बुधवारी चित्रीकरण करण्यास सहमती दर्शवली होती, पण त्याने दुपारी अचानक फोन करुन निर्मात्यांना आणखी काही वेळ मागितला.

रिपोर्टनुसार, शाहरुख खानसाठी सेटवर 20-35 बाउन्सर तैनात होते आणि स्टुडिओमध्ये त्याची व्हॅनिटी व्हॅनही उपस्थित होती. शाहरुख सेटवर येणार होता पण त्याने दुपारी फोन करुन येण्यास नकार दिला. शाहरुख अजय देवगणसोबत या जाहिरातीत दिसणार होता. शाहरुखच्या अनुपस्थितीत अजयने त्याच्या भागाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

शाहरुख खान गेल्या शनिवारपर्यंत एटलीच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता. परंतु शनिवार आर्यनच्या अटकेची बातमी समोर आल्यानंतर शाहरुखने शूटिंग अर्धवट सोडले. अशा परिस्थितीत तातडीने शाहरुखच्या बॉडी डबलला बोलावून चित्रपटाचे काही भाग शूट करण्यात आले, त्यानंतर आता चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.

आर्यनला कॉर्डिएला द इम्प्रेस क्रूझमध्ये सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीमधून ताब्यात घेण्यात आले होते. तपासादरम्यान, आर्यनच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये ड्रग्सच्या पेमेंटसंदर्भातील काही चॅट सापडले आहेत. आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...