आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यनच्या अटकेनंतर शाहरुखने ढाळले होते अश्रू:अधिकाऱ्याने सांगितले – 'आर्यन म्हणाला होता - सर तुम्ही खूप चुकीचे केलेत'

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलाच्या चिंतेमुळे शाहरुख खानच्या डोळ्यात अश्रू आल्याचे अधिका-याने सांगितले.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे. या प्रकरणी त्याला 26 दिवस कोठडीत ठेवण्यात आले होते. क्लीन चिट मिळाल्यानंतरही आर्यनने मौन बाळगले आहे. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय सिंह यांनी आर्यनच्या अटकेबाबत आणि तुरुंगात केलेल्या वक्तव्याबाबत सांगितले आहे. मुलाच्या चिंतेमुळे शाहरुख खानच्या डोळ्यात अश्रू आल्याचेही त्यांनी सांगितले.

संजय यांनी सांगितले की, या प्रकरणादरम्यान ते आर्यन आणि शाहरुख खानच्या संपर्कात होते. शाहरुखला त्याच्या मुलाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी वाटत होती. पाणावलेल्या डोळ्यांनी संवाद साधताना शाहरुख मला म्हणाला होता, "समाजाला उद्ध्वस्त करण्यासाठीच घरातून बाहेर पडणाऱ्या गुन्हेगार किंवा राक्षसासारखे आम्हाला दाखवले गेले."

आर्यन म्हणाला होता - सर तुम्ही खूप चुकीचे केलेत
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीचे नेतृत्व एनसीबीचे अधिकारी संजय सिंह यांनी केले होते. आर्यन त्यांना म्हणाला, 'तपास यंत्रणा मला ड्रग तस्करारसारखी वागणूक देत आहे. मी ड्रग्ज विकतो असे दाखवले जात आहे. हे आरोप निराधार नाहीत का?,' असे तो म्हणाला होता

इतकेच नाही तर आर्यनने सवाल केला होता की, "क्रूझवर माझ्याकडे कोणतेही ड्रग्जही मिळाले नाही, तरीही मला अटक करण्यात आली. माझ्याविरुद्ध पुरावे सापडले नसताना मला इतके दिवस कारागृहात का ठेवले? मी खरंच गुन्हेगार आहे का? सर तुम्ही खूप चुकीचे केले आहे आणि माझी प्रतिष्ठा मलिन केली आहे."

याच आधारे आर्यनला मिळाली क्लीन चिट

  • NCB चे डीजी संजय सिंह यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अरबाज मर्चंटने आपल्या जबाबात सांगितले की, त्याच्याकडे जप्त केलेले ड्रग्ज आर्यन खानसाठी नव्हते.
  • ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्यनचे मेडिकल झाले नाही, त्यामुळे आर्यनने ड्रग्ज सेवन केले होते की नाही हे सिद्ध होऊ शकले नाही?
  • अरबाजने आपल्या जबाबात असेही सांगितले होते की, आर्यनने क्रूझवर ड्रग्ज घेऊन जाण्यास नकार दिला होता.
  • चौकशीदरम्यान एकाही ड्रग्ज तस्कराने आर्यनला ड्रग्ज पुरवल्याचे सांगितले नाही.

2 ऑक्टोबर रोजी NCB ने क्रूझवर छापा टाकला
2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीच्या पथकाने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूडेलिया क्रूझवर छापा टाकला. यावेळी तेथून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम मेफेड्रोन, 21 ग्रॅम गांजा, 22 एमडीएमए (एक्स्टसी) गोळ्या आणि रोख 1.33 लाख रुपये जप्त करण्यात आले.

एजन्सीने क्रूझवरुन 14 लोकांना पकडले होते आणि अनेक तासांच्या चौकशीनंतर, आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुम धमेचा यांना 3 ऑक्टोबर रोजी दुपारी अटक केली. त्यानंतर हळूहळू या प्रकरणात आणखी 17 जणांना अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...