आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यन प्रकरणात मोठा खुलासा:'किरण गोसावीने शाहरूख खानकडे केली होती 18 कोटींची मागणी, त्यातील 8 कोटी NCB अधिकाऱ्याच्या वाट्याला', गोसावीच्या बॉडीगार्डने दिल्ली धक्कादायक माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किंग खान शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्सप्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीने शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची मागणी केली होती. असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. त्यात धक्कादायक म्हणजे 18 कोटींवर ही डील सुद्धा झाली आहे. हा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांने केला आहे.

प्रभाकर साईल याने एनसीबीच्या एका अधिकाऱ्यावर आणि केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहे. केपी गोसावी आणि प्रभाकर साईल या दोघांचा फोटो आर्यन खानसोबत समोर आला आहे. प्रभाकरने आरोप केले आहे की, केपी गोसावीला मी 25 कोटी रुपयांबद्दल बोलतांना ऐकले आहे. मात्र ही डील 18 कोटी रुपयांमध्ये झाली होती. त्यातले 8 कोटी रुपये एका एनसीबीच्या अधिकाऱ्याला द्यायचे होते. असा धक्कादायक खुलासा प्रभाकर साईलने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...