आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज प्रकरण:आर्यनच्या जामीन याचिकेवर सुनावणी होण्यापूर्वी वडील सलीम खानसह शाहरुखच्या भेटीला 'मन्नत'मध्ये पोहोचला सलमान खान, फोटो व्हायरल

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडील सलीम खान यांच्यासोबत पोहोचला सलमान

अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान एकमेकांचे चांगले मित्र आहेत. किंग खानच्या या कठीण दिवसांमध्ये सलमान आपली मैत्री निभावताना दिसत आहे. शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग प्रकरणी सध्या तुरुंगात असल्याने शाहरुख आणि त्याचे कुटुंब सध्या खूप तणावाखाली आहेत. 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर झालेल्या रेव्ह पार्टीतून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यनला ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान आर्यनने ड्रग्ज घेतल्याची कबुली एनसीबीकडे दिली. सध्या आर्यन 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात तो असून त्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी सुरू आहे. या सुनावणीपूर्वी सलमान खान त्याचे वडील सलीम खान यांच्यासह शाहरुखला भेटण्यासाठी 'मन्नत'मध्ये पोहोचला होता.

वडील सलीम खान यांच्यासोबत पोहोचला सलमान
अभिनेता सलमान खानची कार बुधवारी सकाळी शाहरुखच्या 'मन्नत' या बंगल्याबाहेर दिसली होती. यावेळी सलमानचे वडील आणि लेखक सलीम खान त्याच्यासोबत होते. 2 ऑक्टोबर रोजी आर्यन खानच्या अटकेनंतर, सलमान सर्वप्रथम मन्नतवर पोहोचला होता. सलमान व्यतिरिक्त त्याच्या बहिणी अलविरा आणि अर्पिता देखील गौरी आणि शाहरुखला पाठिंबा देण्यासाठी मन्नतला पोहोचल्या होत्या.

सोशल मीडियावर नेटक-याने पोस्ट केला फोटो
मन्नतच्या बाहेर असलेल्या सलमानच्या कारचा फोटो शेअर करताना एका युजरने सोशल मीडियावर लिहिले, "सलमान खान त्याचे वडील सलीम खानसोबत मन्नतमध्ये... आम्ही तुझ्यावर प्रेम करतो शाहरुख.'

सत्र न्यायालयात आज होणार जामीन याचिकेवर सुनावणी
आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. अलीकडेच मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यन तुरुंगात असल्याने शाहरुख आणि गौरी खान खचून गेले आहेत. दोघेही स्वतःला असाहाय्य समजत आहेत.

शाहरुखच्या निटवर्तीयाने सांगितल्यानुसार, शाहरुख सध्या फारच दु:खात आहे. तो नेहमीप्रमाणे जेवतही नसून पुरेशी झोपही घेत नाहीय. तो एखाद्या असहाय बापाप्रमाणे झाला आहे. त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. आर्यनच्या तब्येतीविषयी जाणून घेण्यासाठी शाहरुख आणि गौरी दिवसातून अनेक वेळा फोन करत असतात.

बातम्या आणखी आहेत...