आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडचे ड्रग्ज कोडवर्ड्स:आर्यनने ड्रग पॅडलरला 'फुटबॉल' आणण्यास सांगितला, याचा अर्थ मोठ्या प्रमाणात ड्रग्ज - NCBचा दावा

विनोद यादव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • फुटबॉल या कोर्डवर्डचा खुलासा NCB कडून ASG अनिल सिंह यांनी किल्ला कोर्टात केला

क्रूझ ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली आहे. न्यायलयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर शुक्रवारी मुंबईच्या किल्ला कोर्टात सुनावणी झाली. या दरम्यान, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटचा हवाला देत मोठा खुलासा केला.

एएसजी अनिल सिंह यांनी न्यायालयाला सांगितले की, ड्रग्ज सप्लाय करण्याच्या आरोपात अटकेत असलेल्या अचित कुमारचे एक व्हॉट्स अ‍ॅप संभाषण एनसीबीच्या हाती लागले आहे. यामध्ये आर्यन त्याला कोडवर्डमध्ये 'फुटबॉल' आणण्यास सांगत आहे. अचित कुमार हा ड्रग पॅडलर आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंटच्या सांगण्यावरून त्याला एनसीबीने पवई परिसरातून अटक केली आहे.

NCB ने सांगितला 'फुटबॉल' चा अर्थ काय आहे?
'फुटबॉल' या कोडवर्डचा अर्थ एनसीबीच्या वतीने एएसजी अनिल सिंह यांनी किल्ला न्यायालयात उघड केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, एनसीबीला संशय आहे की 'फुटबॉल'चा अर्थ 'मोठ्या प्रमाणात' ड्रग्ज असा होतो. सोबतच ते म्हणाले की, न्यायालयात अशा कोडवर्डबद्दल अधिक बोलणे योग्य नाही.

दीपिकाचे ड्रग्ज चॅट देखील झाले होते लीक
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीच्या हवाल्याने एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट देखील लीक होऊन व्हायरल झाले होते. ज्यामध्ये 'हॅश' आणि 'वीड' सारखे कोडवर्ड वापरले गेले होते. एनसीबीच्या मते, याचा अर्थ 'चरस' आणि 'गांजा' असा होता. या प्रकरणात दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिची NCB ने चौकशी केली होती.

याचप्रकरणात दीपिकाला एनसीबी कार्यालयात बोलावून तिचीदेखील बराच काळ चौकशी करण्यात आली होती. मात्र, चौकशीदरम्यान दीपिकाने सांगितले होते की, करिश्मा प्रकाश आणि ती मोठी सिगारेट आणि लहान सिगारेट याच्याबद्दल चर्चा करत होत्या.

रिया चक्रवर्तीचा कोडवर्डही समोर आला होता
रिया चक्रवर्ती आणि शोविक यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅ​​​​​​​प चॅटमध्ये 'बड' या कोर्डवर्डचा वापर झाला होता. त्याचप्रमाणे अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान ड्रग्जसाठी 'रुपया', 'डॉलर' आणि 'पाउंड' सारखे कोडवर्ड वापरले गेले असल्याचे समोर आले होते.

बातम्या आणखी आहेत...