आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यात पहिल्यांदा शाहरुख खऱ्या कारागृहात पोहोचला:काचेच्या भिंतीच्या मागे उभ्या असलेल्या मुलाशी बोलला शाहरुख खान, दोघेही झाले होते भावूक

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावेळी शाहरुखने माध्यमांशी बोलणे टाळले.

आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. बुधवारी ड्रग्ज प्रकरणात सत्र न्यायालयाने त्याची जामीन याचिका फेटाळली. त्यानंतर गुरुवारी सकाळी शाहरुख खान तुरुंगात त्याच्या मुलाला भेटण्यासाठी दाखल झाला होता. शाहरुखने सुमारे 18 मिनिटे तुरुंगात घालवली आणि या दरम्यान वडील आणि मुलामध्ये 10 मिनिटे इंटरकॉमवर बोलणे झाले. असे म्हटले जाते की, शाहरुखची खऱ्या कारागृहात पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शाहरुख खान गुरुवारी सकाळी 9.20 वाजता आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत त्याचे काही कर्मचारी आणि अंगरक्षक होते. शाहरुख तुरुंगात मुलाला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती माध्यमांना आधीच मिळाली होती.

कारागृहाबाहेर इतकी गर्दी होती की, शाहरुखला कारमधून बाहेर पडून जेलमध्ये जाण्यात खूप अडचणींना सामोरे जावे लागले. शाहरुखचे कर्मचारी दोन वाहनांमध्ये त्याच्यामागे आले. त्याच्या बॉडीगार्डने त्याला कारागृहात प्रवेश मिळवू दिला.

शाहरुख त्याच्या दोन अंगरक्षक आणि दोन महिला कर्मचाऱ्यांसह तुरुंगाच्या आत गेला. तुरुंगात गेल्यानंतर तो सर्वप्रथम तुरुंग अधिकाऱ्याशी बोलला आणि नंतर तो बैठकीच्या खोलीत गेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीपूर्वीची औपचारिकता त्याची मॅनेजर पूजा ददलानीने पूर्ण केली.

आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांच्यासोबत शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी.
आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांच्यासोबत शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी.

विशेष गोष्ट म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट बंद होती. आजपासून नियम बदलले आहेत आणि आता कुटुंबातील दोन सदस्य कोणत्याही कैद्याला भेटू शकतात.

शाहरुख खान आर्यनसोबत सुमारे 18 मिनिटे बातचीत केली. यावेळी दोघेही एकमेकांना पाहून भावून झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने शाहरुखला अनेक वेळा 'आय अॅम सॉरी' म्हटले.

या भेटीदरम्यान शाहरुखने तुरुंगातील कर्मचाऱ्यांना आर्यनला काही खाण्यास देऊ शकता येईल का? असे विचारले. त्यावर तुरुंग प्रशासनाने त्यांना मनाई केली. यानंतर शाहरुख आणखी काही काळ तेथे थांबला आणि तुरुंग अधिकाऱ्यांना मुलाची काळजी घेण्याची विनंती केली.

मुलाला भेटून शाहरुख बाहेर आला तेव्हा त्याच्यासोबत तुरुंगातील काही पोलिसही होते. मीडिया आणि बाहेरची गर्दी पाहून अभिनेत्याच्या कर्मचाऱ्यांनी जेलरला त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी पाठवण्याची विनंती केली होती.

मुलाला भेटून कारागृहातून बाहेर येताना शाहरुखला त्याच्या गाडीपर्यंत पोहचणे कठीण होते. मुंबई पोलिसांची टीम आणि त्याच्या बॉडीगार्ड्सनी त्याला कसेबसे कारपर्यंत पोहोचवले होते.

यावेळी शाहरुखने माध्यमांशी बोलणे टाळले.

यापूर्वी शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांचे आर्यनसोबत व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे झाले होते.

माध्यमातील लोक कारागृहातून बाहेर आलेल्या शाहरुखला आर्यनसोबतच्या भेटीबद्दल प्रश्न विचारत राहिले, पण तो काहीही न बोलता निघून गेला.

बातम्या आणखी आहेत...